Join us

'सोनपरी'मधील फ्रूटी आता काय करते? अभिनेत्रीचा बदलला लूक! फोटो बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 17:25 IST

1 / 7
९० दशकातील सर्वाधिक गाजलेली आणि लोकप्रिय मालिका म्हणजे सोनपरी. यातील सोनपरी आणि फ्रुटी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. ही मालिका सुरु झाली की मुलं टीव्हीसमोरच बसून राहायची.
2 / 7
'सोनपरी'मध्ये अभिनेत्री तन्वी हेगडेने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी परीच्या भूमिकेत पाहायला मिळाली.
3 / 7
निरागस हास्य आणि सहज सुंदर अभिनयाने तन्वीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. 'सोनपरी' ने तिला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली.
4 / 7
त्यानंतर तन्वीने 'राहुल', 'पिता', 'विरुद्ध', 'वाह! लाईफ हो तो ऐसी', 'चल चले', 'धुरंधर भाटवडेकर', 'अथांग', 'शिवा' या चित्रपटांसोबतच 'शाका लाका बूम बूम' आणि 'सोनपरी' या मालिकांमध्ये अभिनय केला आहे.
5 / 7
शेवटची ती २०२१ मध्ये आलेल्या 'अलिप्त' या मराठी चित्रपटात दिसली होती. त्यानंतर तन्वीने अभिनयातून ब्रेक घेतला.
6 / 7
तन्वी ‘सोनपरी’ची मालिका करत असताना ती दहा वर्षांची होती. आता ती ३४ वर्षांची झाली आहे. आता ही अभिनेत्री गेमिंग क्षेत्रात रमली आहे.
7 / 7
आता फ्रुटी मोठी झाली आहे आणि ती फारच सुंदर दिसते. याची प्रचिती तिचे फोटो पाहून तुम्हाला आली असेल..
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया