Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता Siddhant Vir Suryavanshiच्या निधनानंतर पत्नीने शेअर केली भावूक पोस्ट, म्हणाली-शेवटच्या क्षणापर्यंत ..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 15:42 IST

1 / 12
लोकप्रिय टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचा वयाच्या ४६ व्या वर्षी जिममध्ये वर्कआउट करताना ह्रदयविकाराचा झटका येऊन निधन झालं. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 12
सिद्धांतच्या जाण्याने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. त्याची पत्नी अलिशिया राऊतनं त्याच्यासोबतचा पहिला फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. यासोबतच अलिशिया एक भावनिक पोस्टही लिहिली आहे.(फोटो इन्स्टाग्राम)
3 / 12
सिद्धांतच्या जाण्याच्या अलिशिया पुरती कोलमडून गेली आहे. तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमधून हे जाणवतं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 12
अलिशिया आणि सिद्धांतचं लग्न २०१७ साली झालं होतं. अलिशियानं सिद्धांतसोबतच्या पहिल्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 12
अलिशियानं लिहिले- “मी तुझ्यावर प्रेम करते आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत करत राहीन. 24 फेब्रुवारी 2017 रोजी आम्ही आमचा हा पहिला फोटो क्लिक केला होता. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 12
या दिवसापासून, मी हसत राहावे, माझे जीवन आनंदाने जगावे अशी तुझी इच्छा होती. तू नेहमी माझी काळजी घेतलीस आणि मला आठवण करून द्याचास मी वेळेवर जावावं. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 12
तू एकटाच माणूस होतास ज्याने मला कोणतीही भीती न बाळगता माझा हात धरुन नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिलास.(फोटो इन्स्टाग्राम)
8 / 12
मी तुझ्यासोबत एक लहान मुलासारखे राहिले, नेहमी तुझे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. तुझे हास्य, तुझ्या डोळ्यातील सर्वांबद्दलचे प्रेम, काळजी घेणारा स्वभाव मला सदैव लक्षात राहील. (फोटो इन्स्टाग्राम)
9 / 12
तू एक प्रेमळ मुलगा, भाऊ, मुलांसाठी एक प्रेमळ वडील, एक प्रेमळ पती आणि एक चांगला मित्र होता. मला माहित आहे की तू नेहमी मला देवदूत म्हणून मार्गदर्शन करत राहशील. (फोटो इन्स्टाग्राम)
10 / 12
तू आनंदी आणि शांत ठिकाणी राहा. मी नेहमी तुझ्यावर प्रेम करीन. प्रेमाचा खरा अर्थ तू मला समजावला आहेस. आता अलिशियाची ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनी यावर कमेंट करत आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
11 / 12
२००१ मध्ये त्यांने ईरा सुर्यवंशीसह लग्नगाठ बांधली होती. २०१५ मध्ये पहिली पत्नी इरा सूर्यवंशीपासून तो वेगळे झाला. सिद्धांत व ईराला डिजा ही मुलगी आहे. घटस्फोटानंतरही सिद्धांत मुलीसोबत जवळचे संबंध होते. (फोटो इन्स्टाग्राम)
12 / 12
यानंतर त्याने २०१७ साली सिद्धांतने रशियन मॉडेल अलिशिया राऊतसह नव्या आयुष्याची सुरुवात केली. सिद्धांत प्रमाणे अलिशियाचं हे दुसरं लग्न असून तिला पहिल्या पतीपासून एक मुलगा आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :टिव्ही कलाकारमृत्यूहृदयविकाराचा झटका