Join us

"हा एकमेव सेट होता जिथे मला दररोज खूप वाईट वागणूक..."; अभिनेत्रीने मांडली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 15:10 IST

1 / 10
अभिनेत्री श्वेता बसू प्रसादने अलीकडेच सेटवर तिच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाबद्दल सांगितलं. श्वेता एका तेलुगू चित्रपटात काम करत होती ज्यामध्ये तिच्या उंचीमुळे तिला खूप त्रास देण्यात आला.
2 / 10
बॉलीवूड बबलशी बोलताना श्वेता म्हणाली, 'मी एक तेलुगू चित्रपट करत होते आणि त्या चित्रपटाची संपूर्ण टीम दररोज माझ्या उंचीवरून कमेंट करायची.'
3 / 10
'माझा हिरो बराच उंच होता, तो ५'११ किंवा जवळजवळ ६ फूट उंच होता आणि मी ५'२ उंचीची आहे. तो प्रत्येक सीनमध्ये गोंधळ घालायचा. रिटेक द्यायचा.'
4 / 10
'तो तेलुगू होता पण तरीही त्याला त्याची भाषा बोलता येत नव्हती. मलाही ती भाषा येत नव्हती पण मी मॅनेज करत होती.'
5 / 10
'जेव्हा कोणी माझ्यावर कमेंट करायचे तेव्हा मला असं वाटायचं की तुम्ही मला अशा गोष्टीबद्दल सांगत आहात ज्यावर माझा कंट्रोल नाही.'
6 / 10
'ही अशी गोष्ट आहे जी जेनेटिकली आहे, तुम्ही ती मॅनेज करू शकत नाही. हा एकमेव सेट होता जिथे मला खरोखर दररोज खूप वाईट वागणूक दिली गेली.'
7 / 10
श्वेता इंडिया लॉकडाउन, मकडी, सिरियस मेन आणि इक्बाल सारख्या प्रोजेक्टसाठी ओळखली जाते.
8 / 10
श्वेताने आपल्या अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचे असंख्य चाहते आहेत.
9 / 10
अभिनेत्री सोशल मीडियावर खूपच जास्त एक्टिव्ह आहे. ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
10 / 10
टॅग्स :श्वेता बासू प्रसादबॉलिवूड