Rahul Mody: बॉयफ्रेंडपेक्षा इतक्या वर्षांनी मोठी आहे श्रद्धा कपूर, नक्की काय करतो राहुल मोदी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 14:17 IST
1 / 8हिंदी सिनेमातील 'खूबसूरत' अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. राहुल मोदीसोबत (Rahul Mody) ती रिलेशनशिपमध्ये असून नुकताच तिने मुंबईबाहेर बॉयफ्रेंडसोबत वाढदिवस साजरा केला.2 / 8श्रद्धाने कायमच तिचं लव्हलाईफ प्रायव्हेट ठेवलं आहे. पण आता ती मोकळेपणाने राहुलवरचं प्रेम व्यक्त करत असून त्याच्यासोबत फिरतानाही दिसत आहे.3 / 8राहुलला पाहून अनेकांनी श्रद्धाची खिल्लीही उडवली. याच्यापेक्षा चांगला मिळाला असता असं म्हणत अनेकांनी कपलला ट्रोल केलं. मात्र श्रद्धा राहुलच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचंच दिसून येतं. राहुल मोदी नक्की आहे तरी कोण? 4 / 8मेटल फॅब्रिकेशन कंपनीचे मालक आणि बिझनेसमन अमोद मोदी यांचा तो मुलगा आहे. राहुलचा जन्म ७ ऑक्टोबर १९९० रोजी झाला. याचा अर्थ राहुल श्रद्धाहून तीन वर्षांनी लहान आहे.5 / 8राहुलचं शिक्षण मुंबईतच झालं आहे. वडिलांचा बिझनेस सांभाळायचा म्हणून त्याने इंजिनिअरिंग केलं होतं. राहुलला सोनिका मोदी ही बहीण आहे. तिने सुभाष घईंच्या व्हिसलिंग वुड्स फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटमधून शिक्षण घेतलं.6 / 8राहुल तेव्हा बहिणीला कॉलेजला सोडायला आणि घ्यायला जायचा. तेव्हा तो फिल्मसिटीतले शूट्स बघत टाईमपास करायचा. नंतर त्यानेही बहिणीच्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतली. फिल्म प्रोडक्शन शिकला मात्र दुसऱ्या वर्षात असताना त्याने कोर्स अर्धवट सोडला.7 / 8२०११ मध्ये त्याला 'प्यार का पंचनामा' सिनेमात इंटर्न म्हणून काम केलं. २०१२ मध्ये आलेल्या 'आकाशवाणी' सिनेमासाठी सहायक दिग्दर्शकाचं काम केलं. 8 / 8राहुलने 'सोनू के टिटू की स्वीटी' आणि श्रद्धा कपूरच्या 'तू झूठी मै मक्कार' सिनेमाचं लेखन केलं आहे. सध्या राहुल आणि श्रद्धाच्या लग्नाच्या चर्चाही जोरात सुरु आहेत.