MBBS आहे 'ही' मराठी अभिनेत्री, मुस्लिम बॉयफ्रेंडशी लग्न करुन बदलला धर्म; घटस्फोटानंतर पश्चात्ताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 11:55 IST
1 / 9मराठमोळी अभिनेत्री जिने हिंदीतही अभिनयाचा डंका गाजवला. मिसेस वर्ल्ड हा किताब जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली. इतकंच नाही तर तर ती फक्त अभिनेत्री किंवा मॉडेलच नाही तर डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञ आहे. कोण आहे ही?2 / 9'ब्युटी विथ ब्रेन' या टायटलला चपखल बसणारी ही अभिनेत्री आहे अदिती गोवित्रीकर (Aditi Govitrikar). 'दे दना दन','पहेली' या सिनेमांमध्ये ती दिसली. नुकतंच तिला 'मिसमॅच्ड' सीझन ३ मध्ये छोट्या भूमिकेत पाहिलं गेलं.3 / 9अदिती गोवित्रीकरचा जन्म पनवेलमध्ये झाला. १९९७ साली ती ग्रांट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस चं झाली. MBBS नंतर तिने मॉडेलिंगमध्ये प्रवेश केला. 4 / 9अदिती बॉलिवूड सिनेमांमध्ये छोट्या भूमिका करत होती. तर दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यात तिने एका मुस्लिम मुलाशी लग्नगाठ बांधली. त्याचं नाव मुफजल लकडावाला. दोघंही मेडिकल कॉलेजमध्येच भेटले होते आणि सहा वर्ष एकमेकांना डेट करत होते.5 / 9अदिती आणि मुफजलच्या नात्याला तिच्या पालकांचा कडाडून विरोध होता. मात्र अदिती प्रेमात असल्याने तिने पालकांचा विरोध झुगारुन १९९८ साली मुफजलशी लग्न केले. इतकंच नाही तर तिने इस्लाम धर्म स्वीकारत सारा लकडवाला असे नाव केले. 6 / 9१९९६ साली अदितीने ग्लॅडरॅग्स मेगामॉडेल स्पर्धा जिंकली होती. तर २००० साली तिने ग्लॅडरॅग्स मिसेस इंडिया किताब पटकावला. तिने खतरो के खिलाडी सीझन १ आणि बिग बॉस सीझन ३ मध्येही सहभाग घेतला होता. 7 / 9अदितीचे वैवाहिक आयुष्य चांगले सुरु होते. १९९९ मध्ये तिने कियारा या मुलीला जन्म दिला. तर २००७ मध्ये तिला मुलगा झाला. 8 / 9मात्र अदितीचे वर्क कमिटमेंट्स आणि मुफजलच्या व्यस्त वेळापत्रकामुळे दोघांमध्ये दुरावा आला. अखेर २००८ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.9 / 9मुफजल यांनी नंतर प्रिया कौलशी दुसरं लग्न केलं. त्यांना एक मुलगा आहे. तर दुसरीकडे अदितीने एकटीनेच दोन्ही मुलांचा सांभाळ केला. एका मुलाखतीत अदितीने लग्न वाचवू शकले नाही अशी खंत व्यक्त केली होती.