Join us

कोट्यावधींची मालकीण आहे गौरी खान; संपत्तीच्या बाबतीत शाहरुखला देतीये टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 16:30 IST

1 / 10
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करतोय. त्यामुळेच आज तो बॉलिवूडचा बादशाह या नावाने ओळखला जातो.
2 / 10
कलाविश्वातील सर्वाधिक श्रीमंत कलाकारांच्या यादीत किंग खानचं नाव कायमच घेतलं जातं. विशेष म्हणजे कमाईच्या बाबतीत शाहरुखची पत्नी गौरी खानदेखील (Gauri Khan) त्याला तोडीसतोड आहे.
3 / 10
शाहरुखप्रमाणेच गौरी सुद्धा कोट्यवधींची मालकीण असून ती यशस्वी बिझनेस वूमन आहे.
4 / 10
गौरी खान कलाविश्वातील प्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर आहे. आजपर्यंत तिने अनेक सेलिब्रिटींची घरं सजवली आहेत.
5 / 10
मुकेश आंबानी, Roberto Cavalli, Ralph Lauren या सारख्या जगभरात प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींची घरंदेखील गौरीने डिझाइन केली आहेत.
6 / 10
जॅकलीन फर्नांडिस, रणबीर कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, करण जोहर या कलाकारांची घरदेखील तिने डिझाअन केली आहेत. त्यामुळे गौरी महिन्याला कोट्यावधींचा बिझनेस करते हे लक्षात येतं.
7 / 10
फॉर्च्यून मॅगझीमध्येदेखील ५० मोस्ट पॉवरफूल वूमेनमध्ये तिच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.
8 / 10
सूत्रांच्या माहितीनुसार, शाहरुखचं नेटवर्थ ५१०० कोटी रुपये आहे. तर गौरीचं नेटवर्थ १६०० कोटी रुपये इतकं आहे.
9 / 10
मुंबईमध्ये गौरीचं एक लक्झरी शॉप असून त्याची किंमत १५० कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं.
10 / 10
इंटेरिअर डिझायनिंगसह गौरी चित्रपट निर्मातीदेखील आहे. तिने २००२ मध्ये 'रेड चिलीज एंटरटेनमेंट' या प्रोडक्शन हाऊसची सुरुवात केली. या प्रोडक्शन हाऊसअंतर्गंत 'मै हूं ना', 'ओम शांति ओम', 'हॅप्पी न्यू ईयर', 'बदला', 'रईस', 'डियर जिंदगी' या चित्रपटांची निर्मिती केली आहे.
टॅग्स :गौरी खानशाहरुख खानबॉलिवूडसेलिब्रिटी