Satish Kaushik Iconic Roles: कॅलेंडर, पप्पू पेजर ते शराफत अली...पाहा सतीश कौशिक यांच्या आजरामर भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 15:01 IST
1 / 9 Satish Kaushik Iconic Roles: कधी हसवलं तर कधी रडवलं...सतीश कौशिक जेव्हाही स्क्रीनवर यायचे, तेव्हा प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसु खुलायचं. आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणाऱ्या सतीश कौशिक यांचे आज अचानक निधन झाले. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. 2 / 9 सतीश कौशिक असे अभिनेते होते, जे दिलेल्या पात्रामध्ये पूर्णपणे मिसळून जायचे. त्यांना मोठ्या पडद्यावर पाहणे एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नव्हते. पण चित्रपटसृष्टीतील हा तारा आज निखळला. सतीश कौशिक या जगातून गेले, पण आपल्या विविध पात्रांनी अमर झाले. आज आपण त्यांच्या काही निवडक आणि लोकप्रिय झालेल्या पात्रांविषयी जाणून घेणार आहोत.3 / 9 स्वर्ग(1990)- एअरपोर्ट:- सतीश कौशिक यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या. डेव्हिड धवन आणि गोविंदा या जोडीचा हिट चित्रपट स्वर्गमध्ये सतीश कौशिक यांनी एअरपोर्ट हे पात्र साकारले होते. या चित्रपटात ते विनोदी आणि गंभीर अशा दोन्ही रुपात दिसले आणि प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतलं. त्यांची ही भूमिका नेहमी प्रेक्षकांच्या मनात असेल.4 / 9 मिस्टर इंडिया (1987)- कॅलेंडर:- मिस्टर इंडिया चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने लोकांच्या मनावर खोलवर छाप सोडली. या चित्रपटातून सतीश यांना मोठी ओळख मिळाली. शेखर कपूरच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात सतीश यांनी कॅलेंडर नावाची भूमिका साकारली होती. त्यांच्या कारकिर्दीतील ही एक आयकॉनिक भूमिका होती.5 / 9 राम लखन (1989)- काशीराम:- सुभाष घई यांच्या राम लखन चित्रपटाची कास्टिंग जबरदस्त होती. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, डिंपल कपाडिया, माधुरी दीक्षित आणि अमरीश पुरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सतीश कौशिक यांचीही या चित्रपटात छोटी पण महत्वाची भूमिका होती. या चित्रपटात त्यांनी काशीरामची भूमिका साकारली होती. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मजेदार जोडींपैकी एक असलेल्या देवधरच्या भूमिकेत अनुपम खेरच्या आणि काशीरामच्या भूमिकेत सतीश होते.6 / 9 साजन चले ससुराल (1996) - 'मुत्थु स्वामी':- सतीश यांच्या प्रमुख भूमिकांपैकी एक असलेली मुत्थू स्वामींची भूमिका होती. या चित्रपटात सतीश कौशिक यांनी दक्षिण भारतीय तबला मास्टरची भूमिका साकारली होती. चित्रपटातून त्यांची आणि गोविंदाची जोडी प्रेक्षांकांना खूप आवडली. त्यांच्याशिवाय करिश्मा कपूर आणि तब्बू मुख्य भूमिकेत होत्या.7 / 9 मिस्टर अँड मिसेज खिलाडी (1997)- चंदा मामा:- या हिट विनोदी चित्रपटात सतीश कौशिक यांनी अक्षय कुमारच्या मामाची भूमिका साकारली होती. मिस्टर अँड मिसेस खिलाडी या चित्रपटातील त्यांच्या डायलॉग डिलिव्हरीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. चंदा मामा ही सतीश कौशिक यांच्या प्रतिष्ठित भूमिकांपैकी एक आहे.8 / 9 दीवाना मस्ताना (1997)- पप्पू पेजर:- सतीश कौशिक यांच्या पप्पू पेजरने तर चाहत्यांना घायाळ केले. दीवाना मस्तानामध्ये त्यांनी पप्पू पेजर नावाच्या कॉन्ट्रॅक्ट किलरची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांना चाहते आणि समीक्षकांकडून प्रशंसा मिळाली. हा चित्रपट डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केला होता. अनिल कपूर, गोविंदा आणि जुही चावला मुख्य भूमिकेत दिसले होते.9 / 9 बडे मिया छोटे मिया(1998)- शराफत अली:- प्रेक्षांच्या मनात घर केलेली अजून एक भूमिका म्हणजे बडे मिया छोटे मिया चित्रपटातील शराफत अली. गोविंद आणि अमिताभ बच्चन यांच्यासह सतीश कौशिक यांच्या शराफत अलीला चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. हीदेखील त्यांच्या करिअरमधल्या प्रमुख भूमिकांपैकी एक आहे.