Join us

पहिल्या पतीकडून Karisma Kapoor ला महिन्याला मिळतात इतके लाख; रक्कम ऐकून डोळे होतील पांढरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 12:02 IST

1 / 10
९० चा काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर. आजवरच्या कारकिर्दीत करिश्माने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं.
2 / 10
करिश्माचं प्रोफेशनल लाइफ जितकं चर्चेत राहिलं तितकीच तिच्या वैयक्तिक जीवनाचीही चर्चा रंगली.
3 / 10
करिअरचा आलेख उंचावत असताना करिश्माचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं. मात्र, प्रत्यक्षात तिला आईच्या सांगण्यावरुनच लग्न करावं लागलं.
4 / 10
करिश्माने उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न केलं. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही.
5 / 10
करिश्मा आणि संजय विभक्त होत असताना अभिनेत्रीने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.
6 / 10
२००३ मध्ये या जोडीने लग्न केलं आणि २०१४ मध्ये ते विभक्त झाले. विशेष म्हणजे कलाविश्वातील सर्वात महागडा घटस्फोट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.
7 / 10
या घटस्फोटासाठी संजय कपूरला मोठी रक्कम मोजावी लागली. इतकंच नाही तर, आजही तो करिश्माला महिन्याला बक्कळ पैसे देतो.
8 / 10
सूत्रांच्या माहितीनुसार, संजय कपूर दर महिन्याला करिश्माला १० लाख रुपये देतो.
9 / 10
मुलांच्या संगोपनासाठी तो ही रक्कम देत असल्याचं सांगण्यात येतं.
10 / 10
करिश्माने घटस्फोटानंतर कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. आजही ती सिंगल मदर म्हणून मुलांचा सांभाळ करत आहे.
टॅग्स :करिश्मा कपूरबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा