Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sameera Reddy : '१० वर्षांपूर्वी सर्व अभिनेत्री उठसूठ सर्जरी...', समीरा रेड्डीने उघड केलं बॉलिवुडचं काळं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 16:11 IST

1 / 10
सुंदर आणि चिरतरुण दिसणयासाठी अभिनेत्री काय काय करतील काहीच सांगता येत नाही. १० वर्षांपूर्वी अभिनेत्री वेड्यासारख्या सर्जरी करत सुटल्या होत्या असा खुलासा खुद्द एका अभिनेत्रीनेच केला आहे. ती म्हणजे समीरा रेड्डी.
2 / 10
समीरा बऱ्याच काळापासून बॉलिवुडपासून दूर आपल्या सुखी संसारात मग्न आहे. नुकतेच तिने एका मुलाखतीत बॉलिवुडचे काळे सत्य उघड केले आहे. ज्याचा सामना तिलाही करावा लागला आहे.
3 / 10
समीराने २००२ साली आलेल्या 'मैने दिल तुझको दिया' या सिनेमातून बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर मुसाफिर, टॅक्सी नंबर ९२११ आणि रेस सारख्या चित्रपटात तिने अभिनय केला. मात्र ती फार काळ इंडस्ट्रीत राहिली नाही.
4 / 10
समीराला अनेकदा वाढत्या वजनामुळे सोशल मीडियावर ट्रोल केले गेले आहे. गरोदरपणात तर तिला अनेक अडचणी आल्या. मात्र तिने ना केवळ स्वत:ला स्वीकारले पण बॉडी पॉझिटिव्हिटीबाबत संदेशही देण्यास सुरुवात केली.
5 / 10
एका ताज्या मुलाखतीत तिने काही वर्षांपूर्वीचा बॉलिवुडमधील एक ट्रेंड सांगितला. ती म्हणाली, १० वर्षांपूर्वी एक विचित्र ट्रेंड सुरु झाला होता. तेव्हा प्रत्येक जण प्लास्टिक सर्जरी, बूब जॉब, नाकाची, ओठांची सर्जरी करत होते. मला देखील बूब जॉब करायला एकाने सांगितले होते.
6 / 10
तेव्हा मला असं वाटायचं की खरंच आपणही सर्जरी करावी का? पण मी तसं केलं नाही. देवाचे आभार कारण मी असं केलं असतं तर मी आज इतक्या सहजरित्या त्यावर बोलू शकले नसते.
7 / 10
समीराने सांगितले,मी स्वत: घरात लपून बसायचे. माझी मला लाज वाटायची. प्रेग्नंसीवेळी मी पूर्णपणे कोसळले होते. माझं मानसिक स्वास्थ्य ठीक नव्हतं. यातून बाहेर पडण्यासाठी २ ते ३ वर्ष लागले
8 / 10
यानंतर मी अशा महिलांच्या मदतीसाठी पुढे आले. यातून मलाच पुन्हा उभं राहायला मदत झाली आणि इतरांनाही मदत करता आली याचं समाधान मिळालं.
9 / 10
समीरा आता लिमिटलेस कॅम्पेनचा भाग बनणार आहे जिथे बॉडी पॉझिटिव्हिटीवर खुलेपणाने बोलले जाईल. असे अनेक विषय आहेत ज्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. या मोहिमेतून तेच विषय हाताळण्यात येणार आहेत.
10 / 10
समीराने २०१४ मध्ये अक्षय वर्दे सोबत लग्न केले. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. अक्षय हा मराठी कुटुंबातील असून एक यशस्वी व्यावसायिक आहे.
टॅग्स :समीरा रेड्डीबॉलिवूडआरोग्य