Join us

रणवीर अलाहाबादियाचा जोक अन् समय रैनाला फटका; युट्यूबची कमाई घटली, शो रद्द झाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 22:02 IST

1 / 6
Samay Raina Controversy: प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. रणवीर एक पॉडकास्टर असून, त्याच्या पॉडकास्टमध्ये आतापर्यंत अनेक राजकारण, समाजकारण, बॉलिवूड आणि खेळ जगतातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. युट्यूबवर रणवीरच्या पॉडकास्टला लाखो व्ह्यूस मिळतात. पण आता 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या वादानंतर जवळपास सर्वच सेलिब्रिटींनी त्याच्या पॉडकास्टपासून दूर राहत आहेत. पण, समय रैनाशी त्याची तुलना केली, तर या संपूर्ण वादात रणवीरचे फारच कमी नुकसान झाले आहे.
2 / 6
रणवीर अलाहाबादियाने त्याच्या करिअरची सुरुवात 10 वर्षांपूर्वी केली होती. आज त्याचे स्वतःचे आलिशान घर, ऑफिस अन् अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. त्याचे यूट्यूब आणि सोशल मीडियावरही अनेक चॅनल्स आहेत. त्याने इतका पैसा कमवला आहे की, त्यावर पुढील दहा वर्षे आरामात जगू शकतो. दुसरीकडे, जर आपण समय रैनाबद्दल बोललो तर, तो 5 वर्षांपूर्वी 'कॉमिकिस्तान'चा दुसरा सीझन जिंकून प्रकाशझोतात आला. घर चालवण्यासाठी तो स्टँड अप कॉमेडी करतो. 'इंडियाज गॉट लेटेंट' आणि त्याच्या स्वतःच्या शो व्यतिरिक्त समयकडे असा कोणताही स्रोत नाही, ज्यावर तो पूर्णपणे अवलंबून राहू शकेल.
3 / 6
पण, आता या वादामुळे समय अडचणीत आला आहे. त्याला पुढील काही महिने काम मिळणार नाही. युट्यूबवरुन एपिसोड हटवल्यामुळे 'इंडियाज गॉट लेटेंट' ची कमाई थांबेल आणि अनेक लोक त्यांचे सबस्क्रिप्शन रद्द देखील करू शकतात. यामुळेच महिन्याला सुमारे 1 कोटी रुपये कमावणाऱ्या समयला त्याच्या चॅनलमधून पैसे कमवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.
4 / 6
एकीकडे रणवीर अलाहाबादियासारखे YouTubers मोटिव्हेशनल स्पीकर, फिटनेस गुरू आणि पॉडकास्टर बनून भरपूर पैसे कमावतात, तर दुसरीकडे समयकडे फक्त त्याची कॉमेडी आहे. त्याचे प्रेक्षक त्याच्या चॅनलवर फक्त हसण्यासाठी येतात. त्यामुळे तो चॅनेलवर इतर कोणताही व्हिडिओ बनवून पैसे कमवू शकत नाही. समयने त्याच्या चॅनलवर पुन्हा कॉमेडी केली तर त्याची कॉमेडी क्लीन असेल, याची त्याला पूर्ण काळजी घ्यावी लागेल, अन्यथा त्याच्या अडचणी आणखी वाढू शकतात.
5 / 6
या वादामुळे समयचे अनेक शोज रद्द झाले आहेत. यातून त्याची भरपूर कमाई व्हायची. सोशल मीडियावर दशलक्ष फॉलोअर्स असल्याने समयकडे अनेक ब्रँड एंडोर्समेंट होते. पण, आता त्याचे ब्रँड एंडोर्समेंटदेखील रद्द केले जात आहेत.
6 / 6
बऱ्याच वेळा समय रैना सारख्या ख्यातनाम विनोदी कलाकारांना कॉर्पोरेट किंवा वैयक्तिक कार्यक्रमांसाठी आमंत्रित केले जाते, या कार्यक्रमांसाठी देखील त्यांना 1 ते 5 लाख रुपयांपर्यंत फी दिली जाते. कार्यक्रम मुंबईबाहेर असेल, तर प्रवासाचा खर्चही इव्हेंट टीम उचलते. पण आता या कार्यक्रमांनाही काही ब्रेक लागणार आहे. अशारितीने रणवीर अलाहबादियाचे फार नुकसान होणार नाही, पण समयला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.
टॅग्स :यु ट्यूबबॉलिवूडटेलिव्हिजन