फॅशन बेबी... समंथाचा शर्टलेस बोल्ड लूक, नव्या कोऱ्या फोटोशूटची सोशल मीडियावर तुफान चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 16:45 IST
1 / 7Samantha shirtless photoshoot: दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने गुरुवारी इंस्टाग्रामवर एक अतिशय ग्लॅमरस फोटोशूट शेअर केला आहे. तिचा फोटोशूट इंटरनेटवर चांगलाच चर्चेत आहे. सोशल मीडियावर या फोटोशूटने खळबळ माजवली आहे.2 / 7समंथाचा हा लूक खूपच रिव्हिलींग पण तितकाच आकर्षक आहे. तिचा हा खास बोल्ड लूक चाहत्यांना नक्कीच आवडेल. समंथाने असे मनमोहक फोटोशूट शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही.3 / 7लेटेस्ट फोटोशूटमध्ये समंथा रुथ प्रभू काळ्या रंगाचा पँटसूट परिधान करून पोज देताना दिसत आहे. पण महत्त्वाचं म्हणजे यात ती शर्टलेस आहे.4 / 7तिने परिधान केलेला पँटसूट तिच्यावर उठून दिसत आहे. तिचा बोल्ड शर्टलेस अवतार हे आजचे फोटोशूट व्हायरल होण्याचे खास कारण आहे. या लूकमध्ये तिने काही फोटो शेअर केले आहेत.5 / 7ग्लॅमरस आणि सिझलिंग फोटो शेअर करताना समंथा रुथ प्रभूने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ही आजच्या युगातली फॅशन आहे.' त्यानंतर चाहत्यांनीही तिच्या लूकवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. साऱ्यांना तिचा हा लूक खूपच आवडलाय.6 / 7समंथा रुथ प्रभूचा शर्टलेस लूक केवळ चाहतेच नाही तर सेलिब्रिटींनाही आवडला आहे. वरुण धवनपासून ते रकुल प्रीत सिंगपर्यंत सर्वांनीच हे फोटो लाईक केले तर तमन्ना भाटियाने कमेंट करून अभिनेत्रीचे कौतुक केले.7 / 7सामंथा रुथ प्रभू सध्या आगामी सिटाडेल हनी बनीमध्ये दिसणार आहे. त्यात तिच्यासोबत वरुण धवन दिसणार आहे. (सर्व फोटो सौजन्य- समंथा रूथ प्रभू इन्स्टाग्राम)