Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अरे छोडो यार...'अनेकांचं करिअर उद्धवस्त केल्याच्या आरोपावर सलमानची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 12:47 IST

1 / 9
बॉलिवूड अभिनेता सलमान खान या ना त्या कारणामुळे कायम चर्चेत येत असतो.
2 / 9
कधी फिल्मी गोष्टींमुळे तर कधी वैयक्तिक जीवनामुळे सलमान चाहत्यांमध्ये चर्चेत येत असतो.
3 / 9
आजवर सलमानने अनेक नवोदित कलाकारांचं करिअर घडवलं. तसंच त्याच्यावर काही जणांचं करिअर उद्धवस्त केल्याचाही आरोप करण्यात आला.
4 / 9
सलमानने कलाविश्वातील अनेकांचं करिअर उद्धवस्त केलं असं म्हणत त्याच्यावर आरोप प्रत्यारोप करण्यात आले.
5 / 9
या आरोपांवर पहिल्यांदाच सलमानने प्रतिक्रिया दिली आहे.
6 / 9
अलिकडेच सलमानने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने अनेक गोष्टींवर भाष्य केलं.
7 / 9
'मी स्वत: या इंडस्ट्रीशी संबंधित नाहीये. सेटवर मी जितक्या लोकांसोबत काम करतो तेवढा वेळच मी त्यांच्या संपर्कात असतो. त्यामुळे मी उठसूट रोज पार्ट्या करत बसत नाही. कलाविश्वात माझे बरेच मित्र आहेत. पण, त्यापैकी काही बालपणीचे आहेत तर काही माझ्यापेक्षा सिनिअर', असं सलमान म्हणाला.
8 / 9
पुढे तो म्हणतो, 'मी फार काळ कोणाविषयीचा राग मनात धरत नाही. फक्त मी जेव्हा ड्रिंक्स घेतो त्यावेळी एकच बोलतो, छोडो यार, जाने दो. मी फार काळ एकाच गोष्टीचा विचार करत नाही.'
9 / 9
दरम्यान, या मुलाखतीत सलमानने त्याच्या फिल्मी करिअरविषयी भाष्य केलं. सुरुवातीच्या काळात त्याला कशा समस्यांना सामोरं जावं लागलं हेदेखील त्याने सांगितलं.
टॅग्स :सलमान खानबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा