By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 13:03 IST
1 / 11बॉलिवूड कलाकारांसह अनेकदा त्यांच्या कुटुंबीयांची वा त्यांच्या आसपास असणाऱ्या जवळच्या व्यक्तींची सोशल मीडियावर कायम चर्चा रंगत असते. यातलंच एक नाव म्हणजे सलमान खान.2 / 11अभिनेता सलमान खानसोबत त्याचे कुटुंबीय आणि बॉडीगार्ड शेरा कायम चर्चेत असतात.3 / 11सलमानच्या कुटुंबीयांविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळे आज त्याच्या बॉडीगार्ड शेराविषय़ी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात.4 / 11गेल्या कित्येक वर्षांपासून शेरा, सलमानकडे काम करत असून सलमान त्याला सख्खा भावाप्रमाणे वागणूक देतो.5 / 11शेरा, सलमानचा अत्यंत विश्वासू आणि जूना बॉडीगार्ड असून आज तोही एक सेलिब्रिटी म्हणून ओळखला जातो. 6 / 11शेरा सलमानचा बॉडीगार्ड असण्यासोबतच तो १९८७ मध्ये मिस्टर मुंबई ज्युनिअर आणि १९८८ मध्ये मिस्टर महाराष्ट्र ज्युनिअर सेकंड रनर अप राहिला आहे.7 / 11शेराने सलमानसह मायकल जॅक्सन, विल स्मिथ, जॅकी चॅन यांनाही सिक्युरिटी पुरवली आहे.8 / 11शेरा सलमानचा अत्यंत विश्वासू असल्यामुळे भाईजान त्याच्याकडे खास लक्ष देतो. 9 / 11सलमानला सुरक्षा पुरवण्याच्या बदल्यात शेरा गलेलठ्ठ पगार घेतो.10 / 11शेराला वर्षाला २ कोटी रुपयांचा पॅकेज असून तो महिन्याला लाखो रुपये कमावतो.11 / 11शेराची स्वत:ची एक सुरक्षा एन्जसी आहे. या एन्जसी अंतर्गत तो अनेक दिग्गज व्यक्तींना सुरक्षा पुरवतो.