By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 13:45 IST
1 / 7अभिनेत्री सागरिका घाटगे (Sagarika Ghatge) 'चक दे इंडिया' सिनेमामुळे ओळखली जाते. सिनेमातील तिची प्रिती सब्रवाल ही भूमिका होती. सागरिकाला या सिनेमाने खूप लोकप्रियता मिळवून दिली.2 / 7नंतर ती 'प्रेमाची गोष्ट' या मराठी सिनेमात दिसली. हा सिनेमा म्हणजे एक हलकी फुलकी लव्हस्टोरी होती. यामध्ये तिची जोडी अतुल कुलकर्णीसोबत जमली. यातही तिचं काम प्रेक्षकांना खूप आवडलं. याशिवाय तिने काही हिंदी सिनेमेही केले.3 / 7सागरिकाचा कोल्हापूरच्या मराठी राजघराण्यात जन्म झाला आहे. सागरिकाची आजी सीता राजे घाडगे या इंदौरच्या महाराजा तुकोजीराव होळकर यांच्या कन्या होत्या. 4 / 7नुकतंच हॉटरफ्लाय ला दिलेल्या मुलाखतीत सागरिकाने तिचं बालपण, कुटुंब, महाविद्यालयीन आयुष्य याबद्दल संवाद साधला. यावेळी तिने महिलांच्या सुरक्षेवरही भाष्य केलं तसंच तिला आलेला अनुभवही सांगितला.5 / 7सागरिका म्हणाली, 'मी कॉलेजमध्ये असताना वडिलांना सगळे अपडेट द्यायचे. मुंबईत असताना माझे वडील मी घरी येईपर्यंत जागे राहायचे. माझ्याकडे कधीच घराची चावी नसायची. मी घरी आल्यानंतर मला दार वाजवावं लागायचं आणि बाबा दार उघडायचे.'6 / 7'मुंबई मला कायमच सुरक्षित वाटली. पण कोल्हापूरमध्ये एका मुलाने छेडल्याचं मल आठवतं. तेव्हा मी माझ्या मोठ्या भावाला जाऊन सांगितलं. मग माझ्या भावाने त्याला चांगलंच धमकावलं होतं.'7 / 7२०१४ साली सागरिकाची क्रिकेटर जहीर खानशी भेट झाली. हळूहळू गाठी भेटी वाढल्या आणि त्यांचे प्रेम जुळले. त्यानंतर तीन वर्षांनी २०१७ साली हे दोघे विवाहबद्ध झाले. जहीर आणि सागरिका स्टायलिश कपलपैकी एक आहेत.