Join us
Daily Top 2Weekly Top 5

Raveena Tandon : किसींग सीन, रेप सीन करताना रवीना ठेवायची 'ही' अट, बॉलिवूडची dark side केली उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 11:23 IST

1 / 9
९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री रवीना टंडनने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अक्षय कुमार, गोविंदा, अजय देवगण यांच्यासोबत तिचे चित्रपट चांगलेच गाजले. मोहरा सिनेमातील टिप टिप बरसा पानी मध्ये पिवळ्या साडीत पावसात भिजत रवीनाने ज्या अदा दाखवल्या त्यावर अख्खा तरुणवर्ग फिदा झाला होता.
2 / 9
९० चा काळ गाजवणाऱ्या रवीनाने मात्र आपल्या करिअरमध्ये अनेक अटी ठेवल्या आणि शेवटपर्यंत तिने त्याचे पालनही केले. नुकतेच रवीनाने मुलाखतीत या अटींबद्दल आणि बॉलिवूडमधल्या वाईट अनुभवांबाबत खुलासा केला आहे.
3 / 9
रवीनाने मुलाखतीदरम्यान सांगितले की तिने एकेकाळी स्वीमिंग कॉस्च्युम घालण्यास नकार दिला होता. तसेच रेप सीन करण्याआधीही तिने अट ठेवली होती. माझ्या अंगावर पूर्ण कपडे असतील तरच रेप सीन करेन अशी अट तिने ठेवली होती. अशी पॉलिसी ठेवणारी ती एकटीच अभिनेत्री होती असंही ती म्हणाली.
4 / 9
रवीना म्हणते, 'मी अनेक गोष्टींबाबत अनकम्फर्टेबल होते. अनेक डान्स स्टेप्सही मला पटायच्या नाहीत आणि मी तसं स्पष्ट सांगायचे. मी एकटी अशी अभिनेत्री होते जिने रेप सीन दिला पण एकही कपडा फाटू दिला नाही.'यासाठी अनेकांनी मला गर्विष्ठ समजले होते.
5 / 9
रवीना बॉडी शेमिंगचीही शिकार झाली आहे. एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची खरी वैरीण होती असं रवीना म्हणाली. बॉडी शेमिंग करुन एकमेकींना बॉडी शेम्ड आणि स्लट शेम्डवरुन टीका करायचे.
6 / 9
रवीनाने प्रचंड ट्रोलिंगला कंटाळून इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला होता. जर्नलिस्टही तिच्याबद्दल काही आक्षेपार्ह लिहित होते यालाच कंटाळून तिने ब्रेक घेतला आणि फिल्म डिस्ट्रिब्युटर अनिल थडानीसोबत लग्न केले.
7 / 9
रवीनाने प्रचंड ट्रोलिंगला कंटाळून इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला होता. जर्नलिस्टही तिच्याबद्दल काही आक्षेपार्ह लिहित होते यालाच कंटाळून तिने ब्रेक घेतला आणि फिल्म डिस्ट्रिब्युटर अनिल थडानीसोबत लग्न केले.
8 / 9
रवीनाला यंदा सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यानिमित्त तिच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
9 / 9
रवीनाने पत्थर के फूल या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने 'मोहरा', 'अंदाज अपना अपना', 'लाडला', 'बडे मिया छोटे मिया', 'दुल्हे राजा' अशा अनेक हिट सिनेमात काम केले. आता रवीना आगामी 'केजीएफ ३' आणि 'घुडचढी' या सिनेमात दिसणार आहे.
टॅग्स :रवीना टंडनसोशल मीडियाट्रोलबॉलिवूड