By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 14:08 IST
1 / 9छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रश्मी देसाई नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चेत असते.2 / 9'उतरन' या मालिकेतून रश्मीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्याविषयी कायम चर्चा रंगताना पाहायला मिळते.3 / 9सध्या सोशल मीडियाव रश्मीची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीमध्ये तिने कास्टिंग काऊचा आलेला अनुभव सांगितला आहे.4 / 9कलाविश्वात लोकप्रियता मिळवणाऱ्या रश्मीचा हा प्रवास सोपा नव्हता. तिला बराच स्ट्रगल करावा लागला. याच काळात तिला कास्टिंग काऊच सारख्या घटनेला सामोरं जावं लागलं.5 / 9वयाच्या १६ व्या वर्षी रश्मीला एका ऑडिशनसाठी फोन आला होता. त्यामुळे ती एकटीच त्या ठिकाणी भेटाला गेली. विशेष म्हणजे ती ज्या ठिकाणी गेली त्या ठिकाणी कोणताही कॅमेरा नव्हता. त्यामुळे ती थोडी घाबरली होती.6 / 9ज्या व्यक्तीने तिला भेटायला बोलावलं होतं त्याने लपून तिच्या ड्रिंक्समध्ये नशेची गोळी टाकली होती. आणि, रश्मीसोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात करु लागला होता. पण, घाबरलेल्या रश्मीने मोठ्या हिमतीने या सगळ्याचा विरोध केला.7 / 9कसंबसं करत रश्मी त्या ठिकाणाहून बाहेर पडली आणि थेट घर गाठलं. विशेष म्हणजे रश्मीने ही गोष्ट तिच्या आईला सांगितल्यानंतर तिच्या आईने दुसऱ्या दिवशी त्या माणसाची भेट घेत त्याला चांगलंच चोपलं.8 / 9दरम्यान, याच काळात रश्मीला उतरन सारखी हिट मालिका मिळाली. त्यानंतर तिचं नशीब बदलून गेलं. या मालिकेत तिने तपस्या ही भूमिका साकारली होती. याच मालिकेच्या सेटवर ती अभिनेता नंदिश संधूच्या प्रेमात पडली आणि त्यांनी लग्न केलं. मात्र,त्यांचा संसार फार काळ टिकला नाही.9 / 9रश्मीने उतरननंतर भोजपुरी सिनेमांमध्येही काम केलं आहे. तिने गजब भइल रामा, कब होए गौना हमार, नदिया के तीर, गब्बर सिंह, दूल्हा बाबू, बंधन टूटे न आणि पप्पू के प्यार हो गईल यांसारख्या सिनेमात काम केलं. रश्मी बिग बॉसमध्येही झळकली होती.