1 / 8रश्मी देसाई हे टेलिव्हिजनचं मोठ नाव. दीर्घकाळापासून रश्मी कोणत्याही मालिकेत दिसली नसली तरी तिची चर्चा होत राहते. सध्या तिची चर्चा होतेय ती तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे.2 / 8होय, रश्मीनं नुकतंच एक फोटोशूट केलंय. ते पाहून सगळेच थक्क झाले आहेत. नेव्ही ब्ल्यू कलरच्या डीप वी नेकलाइन शॉर्ट ड्रेसमध्ये रश्मीनं एकापेक्षा एक बोल्ड पोझ दिल्या आहेत.3 / 8तिच्या या फोटोंवर सध्या कमेंट्सचा पाऊस पडतोय. रश्मी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. इन्स्टावर तिचे 50 लाखांवर फॉलोअर्स आहेत.4 / 8कलर्स वाहिनीवर प्रसारित झालेल्या उतरन या मालिकेमुळे रश्मी प्रकाशझोतात आली होती. या मालिकेत रश्मीनं तपस्या ही निगेटीव्ह भूमिका साकारली होती. 2009 साली सुरु झालेली ही मालिका तब्बल सात वर्षांनी 2015 मध्ये संपली होती.5 / 8मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या रश्मीने बिग बॉस, खतरों के खिलाडी, नच बलिए यांसारख्या रियालिटी शोजमध्येही भाग घेतला होता. तिने काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. रश्मीची दिल से दिल तक ही मालिका देखील प्रचंड गाजली होती.6 / 8वयाच्या चौदाव्या वर्षी रश्मीला पहिला चित्रपट मिळाला. तिने 'कन्यादान' या आसामी भाषेतील चित्रपटामध्ये काम करुन कलाक्षेत्रामध्ये पदार्पण केले. हा सिनेमा 2002 साली प्रदर्शित झाला. 7 / 82004 मध्ये रश्मीला हिंदी चित्रपटामध्ये काम करायची संधी मिळाली. ती शाहरुख खान आणि रवीना टंडन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ये लम्हे जुदाई के या हिंदी सिनेमामध्ये झकळली.8 / 8सिनेमांमध्ये काम करत असताना रश्मीने छोट्या पडद्यावर काम करायचे ठरवले. 2006 साली रावण या मालिकेमध्ये तरुण मंदोदरी साकारत रश्मीने या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली.