1 / 7फिल्म इंडस्ट्रीत इंटिमेट सीन्स हा संवेदनशील मुद्दा आहे. अनेक अभिनेते, अभिनेत्री इंटिमेट सीन्स करायला नकार देतात. असेही काही कलाकार आहेत ज्यांनी संपूर्ण करिअरमध्ये आतापर्यंत एकही किसींग सीन दिलेला नाही.2 / 7हिंदी, तमिळ, तेलुगु अशा भाषांमध्ये काम केलेली अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने (Rakul Preet Singh) नुकतंच इंटिमेट सीन्सवर भाष्य केलं. कथेची मागणी असेल तर असे सीन्स देण्यास हरकत नाही असं ती म्हणाली.3 / 72017 साली न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत रकुल म्हणाली होती की, 'मला इंटिमेट सीन्स देण्यास हरकत नाही. जर कथेची मागणी असेल तर मी तयार असेल पण जर बळजबरी प्रसिद्धीसाठी असेल तर असे सीन्स नसावेत.'4 / 7ऑनस्क्रीन लिपलॉकविषयीही तिला प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, 'सर्व कथेच्या मागणीवर अवलंबून आहे. जर गरज असेल तर असे सीन्स देण्यास हरकत नाही.5 / 7'ग्लॅमर इंडस्ट्रीचा भाग आहे. आपल्या आवडत्या कलाकारांना ग्लॅमरस लूकमध्ये बघणं कोणाला नाही आवडणार', असंही ती म्हणाली.6 / 7रकुल प्रीत सिंह यावर्षीच फेब्रुवारी महिन्यात निर्माता जॅकी भगनानीसोबत लग्नबंधनात अडकली. यानंतर आता रकुल कशा स्क्रीप्ट निवडते आणि आता तिचं इंटिमेट सीन्सवर काय मत आहे हे पाहणं महत्वाचं आहे.7 / 7रकुल प्रीत लवकरच 'इंडियन 2' मध्ये दिसणार आहे. १२ जुलैला सिनेमा रिलीज होणार आहे. २८ वर्षांनी 'इंडियन'चा सीक्वेल येत आहे. याशिवाय रकुल 'दे दे प्यार दे'च्या सीक्वेलमध्येही दिसणार आहे.