PHOTOS : ‘हम पांच’ची स्वीटी बनणार नवी दयाबेन? जाणून घ्या ‘ती’ सध्या काय करते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 12:52 IST
1 / 9‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेतील दयाबेन दीर्घकाळापासून गायब आहे. अखेर ती पुन्हा शोमध्ये येणार आहे. मालिकेत नव्या दयाबेनची एन्ट्री होणार आहे. नवी दयाबेन कोण असणार? हे जाणून घेण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशात एका नावाची जोरदार चर्चा आहे.2 / 9हे नाव म्हणजे अभिनेत्री राखी विजान. होय, ‘हम पांच’ फेम स्वीटी उर्फ अभिनेत्री राखी विजान दयाबेनची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा जोरात आहेत. अर्थात राखीने मात्र या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं आहे. काय खरं ते लवकर कळेलच. तूर्तास ही राखी विजान कोण हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.3 / 9 राखीला ‘हम पांच’ या अतिशय गाजलेल्या मालिकेत तुम्ही पाहिलं आहे. तिने या मालिकेत स्वीटी माथूरची भूमिका साकारली होती. होय, त्या स्वीटीला अभिनेत्री व्हायचं होतं आणि शाहरूख खानशी लग्न हे तिचं स्वप्नं होतं. तिच्या या भूमिकेनं सगळ्यांना वेड लावलं होतं.4 / 9‘हम पांच’मधील कुरळ्या केसांची स्वीटी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेनंतर तिने अनेक शोमध्ये भूमिका साकारल्या. अनेक आयकॉनिक रोल साकारले.5 / 9देख भाई देख, बनेगी अपनी बात, बात बन जाए, सिनसिनाटी बबलाबू, हिना, हेरा फेरी, प्रोफेसर प्यारेलाल, जस्सी जैसी कोई नहीं, नागीन 4 अशा हिट मालिकांमध्ये तिने काम केलंय.6 / 9छोट्या पडद्याशिवाय मोठ्या पडद्यावरही ती झळकली. क्रिश 3, मनी है तो हनी है, गोलमाल रिटर्न्स, थँक्यू, सदियां, हमको इश्क ने मारा अशा अनेक चित्रपटांत तिने भूमिका साकारल्या.7 / 9राखी विजानची प्रोफेशनल लाईफ यशस्वी ठरली. पण पर्सनल लाईफमध्ये तिने अनेक चढऊतार पाहिलेत. वैवाहिक आयुष्यात ती फार यशस्वी ठरली नाही.8 / 92004 मध्ये तिने बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचा भाऊ राजीव टंडनसोबत लग्न केलं होतं. मात्र हे लग्न फक्त 6 वर्ष चाललं. सहा वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला.9 / 9राखी सध्या सिंगल आहे. आयुष्यातील प्रत्येक क्षण ती आनंदात जगते. सोशल मीडियावर ती प्रचंड अॅक्टिव्ह आहे.