By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 15:14 IST
1 / 7साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाचा ‘पुष्पा’ हा सिनेमा सध्या प्रचंड गाजतोय. देशभर रिलीज झालेल्या या सिनेमावर प्रेक्षकांच्या जणू उड्या पडत आहेत. 2 / 7इतक्या की अगदी तीनच दिवसांत या सिनेमानं 173 कोटींचा गल्ला जमवलाय. पण सोबतच सिनेमानं एक वादही ओढवून घेतलाये. 3 / 7होय, या वादामुळे सिनेमातील अनेक सीन काढून टाकण्याची वेळ मेकर्सवर आली आहे.4 / 7‘पुष्पा’मध्ये अल्लू अर्जुन व रश्मिकाचे अनेक रोमॅन्टिक व इंटिमेट सीन्स आहेत. पुष्पाराज (अल्लू अर्जुन) एका व्हॅनमध्ये त्याची प्रेयसी श्रीवल्ली हिला नको तिथे स्पर्श करतो आणि श्रीवल्ली भडकते. यावर माझ्या एका हातात फोन होता आणि दुसरा हात कुठे गेला, हे कळलंच नाही, असं पुष्पाराज म्हणतो. नेमका हा सीन पाहून प्रेक्षक भडकले.5 / 7 तेलगू चाहत्यांना हा सीन अजिबात आवडला नाही. चाहत्यांनी तीव्र शब्दांत आपला संताप व्यक्त केला. परिणामी मेकर्सला ऐनवेळी हा सीन चित्रपटातून गाळावा लागला. 6 / 7बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, हा वादग्रस्त सीन चित्रपटाच्या फायनल प्रिंटमधून गाळण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून हा सीन प्रेक्षक चित्रपटात पाहू शकणार नाहीत.7 / 7‘पुष्पा’ हा अल्लू व रश्मिका या जोडीचा एकत्र असा पहिला चित्रपट आहे. चित्रपटात रश्मिका डी-ग्लॅम लूकमध्ये आहे.