Pushpa मधील खतरनाक व्हिलन साकारणारी अभिनेत्री म्हणाली, 'मैं फूल नहीं, बम की तरह नाजुक हूं'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 16:11 IST
1 / 5अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या 'पुष्पा' सिनेमात देशातच नाही तर परदेशातही धुमाकूळ घातला. या सिनेमाच्या माध्यमातून तेलुगु इंडस्ट्रीतील कलाकारांची लोकप्रियताही खूप वाढली. पुष्पामध्ये महत्वाची आणि लक्षवेधी भूमिका साकारणारी अभिनेत्री अनसूया भारद्वाजची चर्चाही खूप झाली. सिनेमात ती मंगलम श्रीनूच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. 2 / 5तिचा लूक आणि रोल फारच वेगळा होता. रिअल लाइफमध्ये ती फारच कूल आहे. होळीनिमित्ताने तिने काही फोटो शेअर केले आहेत. होळी रंग-गुलालाचा उत्सव आहे आणि यानिमित्ताने अनसूयाने गुलाबी-पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील तिचे काही फोटो शेअर केले आहेत.3 / 5तिचे हे लेटेस्ट फोटो पाहून कुणालाही वाटणार नाही की, अनसूया ही तिच आहे जिने पुष्पा सिनेमात व्हिलनची भूमिका केली आहे. सिनेमात ती फारच खतरनाक लूकमध्ये दिसली. पण रिअल लाइफमध्ये अनसूया फारच वेगळी आहे. ती फारच ग्लॅमरस आहे.4 / 5फोटोंच्या कॅप्शनला अनसूयाने लिहिलं की, ''मैं फूल की तरह नाजुक नहीं हूं.. मैं बम की तरह नाजुक हूं...'. दरम्यान ३८ वर्षीय टीव्ही अॅंकर आणि सपोर्टिंग भूमिका करणारी ही अभिनेत्री छोट्या छोट्या भूमिकांमधून आपल्या छाप सोडण्यासाठी ओळखली जाते.5 / 5अनसूयाच्या फोटोंचं कॅप्शन तसंच आहे जसा सिनेमात अल्लू अर्जुनने डायलॉग मारला होता 'पुष्पा नाम समझकर फ्लॉवर समझे क्या...फ्लॉवर नहीं फायर है मैं...' त्याचप्रमाणे तिने वेगळ्या प्रकारे स्वत:ला बॉम्बप्रमाणे घातक सांगितलं.