Join us

Palak Tiwari : "मी माझ्या आईशी..."; पलक तिवारी कोणाला करतेय डेट, का आली चेहरा लपवण्याची वेळ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 17:49 IST

1 / 10
श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी ही तिच्या आईप्रमाणेच खूप प्रसिद्ध आहे. तिच्या ग्लॅमरस लूकने ती नेहमीच लोकांचं लक्ष वेधून घेत असते.
2 / 10
कमी वयातच पलक खूप लोकप्रिय झाली आहे. सैफ अली खानच्या मुलासोबत तिचं नाव सध्या जोडलं जात आहे. पण तिने डेटिंग करत असल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे.
3 / 10
पलक तिवारी एकदा इब्राहिमसोबत दिसली होती. तेव्हा ती खूपच जास्त घाबरली. आईला समजलं तर काय होईल याची तिला भीती वाटत होती.
4 / 10
पलकने स्वत:च सांगितलं की, ती आईसोबत खोटं बोलून बाहेर प़डली होती. ती इब्राहिमला डेट करत नाही तर ती आईमुळे लपत होती.
5 / 10
'इब्राहिम आणि मी फक्त खूप चांगले मित्र आहोत. आम्ही रिलेशनशिपमध्ये असल्याची न्यूज खोटी आहे आणि म्हणूनच मी या गोष्टीकडे कधी लक्ष दिलं नाही.'
6 / 10
'माझी आई श्वेता तिवारीमुळे मी माझ्या चेहरा लपवत होती. कारण मी तिच्यासोबत एक तासाआधीच मी घरी येण्यासाठी निघाली आहे असं खोटं बोलली होती.'
7 / 10
'जेव्हा पापाराजींनी फोटो काढण्यास सुरुवात केली तेव्हा मला वाटलं की, फोटो पाहून आईला सर्व समजेल. तिनेच मला एक फोटो पाठवला आणि खोटारडी मुलगी असं म्हणाली.'
8 / 10
'मी आईची यासाठी माफी मागितली. मी माझा चेहरा इतर कोणासाठी नाही तर श्वेता तिवारीने पाहून नये म्हणून लपवला होता' असं पलकने सांगितलं.
9 / 10
श्वेता आणि पलक तिवारीची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगलेली असते. त्या दोघीही सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असतात.
10 / 10
टॅग्स :पलक तिवारीश्वेता तिवारीबॉलिवूडटिव्ही कलाकार