Join us

Ott Release 2025 : नव्या वर्षात ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका, पाहा कोणत्या वेबसीरिज अन् चित्रपट होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 15:27 IST

1 / 13
Ott Release 2025 : नव्या वर्षाला सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. नव्या वर्षाकडून आपल्या प्रत्येकालाच अनेक अपेक्षा असतात. प्रत्येकजण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत असतो. अनेक बहुप्रतिक्षित वेबसिरीज आणि चित्रपट हे 2025 मध्ये OTT प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन स्ट्रीम केले जाणार आहेत. तर ते कोणते आहेत, यावर एक नजर टाकूया...
2 / 13
3 / 13
'पाताललोक' वेबसीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळालं होतं. आता या सीरिजचा पुढचा सीझन अर्थात 'पाताललोक 2' (Paatal Lok 2) च्या रिलीज डेटची घोषणा झाली आहे. ही वेबसीरिज 17 जानेवारी 2025 ला रिलीज होणार आहे.
4 / 13
'द नाईट एजेंट' या स्पाय थ्रिलर वेबसीरिजचा दुसरा सीझन (The Night Agent Season 2 ) रिलीजसाठी सज्ज आहे. ही वेबसीरिज 23 जानेवारी 2025 रोजी Netflix वर प्रदर्शित होईल.
5 / 13
'ठुकरा के मेरा प्यार' या वेबसीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. आता या वेबसीरिजचा दुसरा सीझन ( Thukra Ke Mera Pyaar Season 2) येतोय. धवन ठाकूर आणि संचिता दास अभिनीत ही वेबसीरिज नवीन वर्षात प्रदर्शित होणार आहे. मात्र, त्याची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही.
6 / 13
'द फॅमिली मॅन' (The Family Man 3) मनोज वाजपेयींची (Manoj Bajpayee) सुपरहिट सीरिज. या सीरिजला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला. आतापर्यंत याचे दोन सीझन आले. तर आता तिसऱ्या सीजनची सर्वांनाच उत्सुकता आहे. वर्ष 2025 च्या दिवाळीला ही सीरिज रिलीज होईल, असं मनोज वाजपेयींनी म्हटलं आहे.
7 / 13
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ चित्रपट निर्माते राजकुमार हिरानी हे वेबसीरिजच्या दुनियेत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. प्रीतम पेडरो (Pritam Pedro) ही विक्रांत मेसी आणि अर्शद वारसी अभिनीत क्राईम थ्रिलर 2025 मध्ये OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर प्रदर्शित केली जाऊ शकते.
8 / 13
नेटफ्लिक्सची लोकप्रिय वेबसीरिज 'स्ट्रेंजर थिंग्स 5' (Strangers Things 5) नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ही वेब सीरिज प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चेत आहे. या वेब सीरिजचे 4 सीझन आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 'स्ट्रेंजर थिंग्स' ही सायन्स फिक्शन, हॉरर ड्रामा मालिका आहे.
9 / 13
तडफदार वकील असलेल्या काजोलच्या 'द ट्रायल'च्या शेवटच्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.या मालिकेचा दुसरा सीझन नवीन वर्ष 2025 मध्ये येऊ शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही विशेष अपडेट आलेले नाही. ही सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
10 / 13
मेगा सुपरस्टार शाहरुख खानचा लाडका लेक आर्यन खान 2025 मध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. त्याची स्टारडम (Stardom) नावाची ही पहिली वेबसीरिज असेल. ही सीरिज प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज होणार आहे.
11 / 13
अभिनेता विजय वर्मा स्टारर वेबसीरिज 'मटका किंग' बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. नवीन वर्षात ही मालिका Amazon Prime Video वर स्ट्रीम केली जाईल. मात्र, त्याची रिलीज डेट अद्याप निश्चित झालेली नाही.
12 / 13
शबाना आझमी, शालिनी पांडे, ज्योतिका आणि गजराव स्टारर क्राईम थ्रिलर वेबसीरिज डब्बा कार्टल (Dabba Cartal) ही 2025 मध्ये नेटफ्लिक्सवर ऑनलाइन स्ट्रीम केली जाईल. ड्रग्ज तस्करीचा मुद्दा यात दाखवण्यात येणार आहे.
13 / 13
साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2' (Pushpa 2: The Rule) हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये चांगलाच धुमाकूळ घालत आहे. थिएटरनंतर हा चित्रपट 2025 मध्ये OTT प्लॅटफॉर्म Netflix वर स्ट्रीम केला जाईल. त्याची रिलीज डेट अद्याप निश्चित झालेली नाही.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीअल्लू अर्जुनमनोज वाजपेयीवेबसीरिज