करिश्मा नाही, ‘ही’ आहे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी कपूर घराण्याची पहिली लेक, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 08:00 IST
1 / 11कपूर घराण्यातील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी पहिली लेक कोण? असा प्रश्न केल्यावर अनेकजण करिश्मा कपूरचं नाव घेतील. करिश्मानं घरच्यांशी बंड करून बॉलिवूड अभिनेत्री बनण्याचा निर्णय घेतला, अशीही चर्चा तुम्ही ऐकली असेल. पण करिश्मा कपूर ही अभिनेत्री बनणारी कपूर घराण्याची पहिली मुलगी नव्हती.2 / 11होय, करिश्मा कपूर हिच्याआधी कपूर घराण्याची एक लेक बॉलिवूडमध्ये आली होती. काही मोजक्या सिनेमात ती दिसली. तिचं नाव काय तर संजना कपूर.3 / 11संजना कपूर ही शशी कपूर व जेनिफर केंडल यांची मुलगी. बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी ती कपूर घरातली पहिली मुलगी आहे.4 / 11शशी कपूर आणि जेनिफर केंडल यांनी लग्न केलं आणि त्यांना करण कपूर, कुणाल कपूर आणि संजना कपूर अशी तीन मुलं झालीत. 5 / 11शशी कपूर यांच्या या तिन्ही मुलांनी म्हणजे करण, कुणाल व संजना यांनी अॅक्टिंगमध्ये नशीब आजमावून पाहिलं. मात्र कपूर घराण्यातील अन्य सदस्यांप्रमाणे त्यांना यश मिळू शकलं नाही.6 / 11शशी कपूर व जेनिफर यांची लाडकी लेक संजना कपूर ही सिनेसृष्टीत पाऊल ठेवणारी कपूर घराण्यातील पहिली मुलगी होती. 1981 मध्ये ‘36 चौरंगी लेन‘ या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यावेळी संजना उणीपुरी 14 वर्षांची होती.7 / 11 वयाच्या 17 व्या वर्षी संजना रेखासोबत ‘उत्सव’ या चित्रपटात झळकली होती. यानंतर नसीरूद्दीन शाह यांच्यासोबत ‘हिरो हिरालाल’ या सिनेमातही ती झळकली.8 / 11बॉलिवूडमध्ये संजना फार यशस्वी होऊ शकली नाही. 1994 साली आलेला ‘अरण्यक’ हा तिचा शेवटचा सिनेमा ठरला. 9 / 11या चित्रपटानंतर संजनाने बॉलिवूडला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. पण आजोबा पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटरशी जुळलेली नाळ तिने तुटू दिली नाही.10 / 111993 ते 2012 या काळात संजनाने पृथ्वी थिएटरमध्ये काम केले. 2012मध्ये तिने जुनून नावाने स्वत:ची थिएटर कंपनी स्थापन केली. 11 / 11संजनाचे लग्न प्रसिद्ध टायगर कन्जर्व अॅक्टिविस्ट वाल्मीक थापरसह झाले आहे. दोघांचा एक मुलगा असून हामिर असे त्याचे नाव आहे.