Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 10:36 IST
1 / 7अभिनेत्री नोरा फतेहीच्या कारचा अंबोली येथील लिंक रोडजवळ अपघात झाला. या अपघातात अभिनेत्रीला किरकोळ दुखापत झाली. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी विनय सकपाळ नावाच्या तरुणाला अटक केली आहे. 2 / 7पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनय सकपाळने नोरा ज्या कारमधून प्रवास करत होती तिला जोरदार धडक दिली. विनय मद्यधुंद असल्याचा संशय आहे. नोरा सनबर्न म्युझिक फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी जात असताना हा अपघात झाला.3 / 7नोरा फतेहीने अपघातानंतर हेल्थ अपडेट दिले आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर करत माहिती दिली. अभिनेत्रीने म्हटलं की, 'हॅलो, मी तुम्हाला सर्वांना कळवू इच्छिते की, मी ठीक आहे.'4 / 7'हो, आज माझा एक गंभीर कार अपघात झाला. एका मद्यधुंद माणसाने माझ्या कारला धडक दिली. धडक जोरदार होती. अपघातानंतर मी खूप हादरले होते. माझं डोकं दारावर आदळलं.'5 / 7'मी जिवंत आणि ठीक आहे. मला फक्त किरकोळ दुखापती झाल्या आहेत. थोडी सूज आहे. पण मी ठीक आहे. मी खूप आभारी आहे. खूप वाईट होऊ शकलं असतं.'6 / 7'मी सांगू इच्छिते की, म्हणूनच तुम्ही दारू पिऊन नशेत गाडी चालवू नये. मला दारू आवडत नाही. खरं सांगायचं तर, मला दारू, ड्रग्ज, गांजासारख्या गोष्टी आवडत नाही.'7 / 7'मला हे कधीच आवडलं नाही. मी त्याला प्रोत्साहन देत नाही. मला अशा गोष्टींभोवती राहणं आवडत नाही. तुम्ही दारू पिऊन गाडी चालवू नये. हे २०२५ आहे आणि मला याबद्दल बोलावं लागत आहे' असं नोराने म्हटलं आहे.