Join us

Nora Fatehi : "मी त्याच्या कानाखाली मारली", सेटवर को-स्टारशी भिडली नोरा फतेही, जोरदार भांडण अन् मारामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 19:08 IST

1 / 10
बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही तिच्या डान्स मूव्हजने चाहत्यांना वेड लावते. एका चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्रीचं को-स्टारसोबत मोठं भांडण झालं होतं.
2 / 10
स्वतः नोरा फतेहीनेच याबाबत सांगितलं आहे. जेव्हा अभिनेत्री कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचली. त्यावेळी तिने या घटनेचा उल्लेख केला होता.
3 / 10
नोराने म्हटलं की, 'रोर: टायगर्स ऑफ द सुंदरबन्स' या चित्रपटाचं ती शूटिंग करत होती. तेव्हा तिचं तिच्या को-स्टारशी मोठं भांडण झालं. याच दरम्यान तिने अभिनेत्याला जोरदार कानाखाली मारली.
4 / 10
तो अभिनेता नोराशी खूप गैरवर्तन करत होता. तिलाही या गोष्टीचा खूप राग आला होता. त्यामुळे ती प्रचंड संतापली आणि तिने त्याला कानाखाली मारली.
5 / 10
नोराने सांगितलं की, 'यानंतर तो को-स्टारही गप्प बसला नाही, त्याने मलाही कानाखाली मारली.'
6 / 10
'आम्ही दोघेही एकमेकांचे केस पकडून भांडू लागलो. हा ड्रामा सेटवर बराच काळ चालू राहिला.'
7 / 10
नोरा आयुष्मान खुरानासोबत कपिल शर्माच्या शोमध्ये 'एन एक्शन हिरो' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती. तिचे बोलणं ऐकून सर्वजण जोरजोरात हसायला लागले.
8 / 10
नोरा फतेहीने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.
9 / 10
अभिनयाव्यतिरिक्त ही अभिनेत्री अनेकदा डान्स रिअॅलिटी शो जज करताना दिसते. तिचे असंख्य चाहते आहेत.
10 / 10
टॅग्स :नोरा फतेहीबॉलिवूड