बॉलिवूडच्या डान्सिंग क्वीन नोरा फतेहीविषयी 'ही' गोष्ट माहितीये का? एकेकाळी होती सेल्स गर्ल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 16:46 IST
1 / 9बॉलिवूडमध्ये आजवर असे असंख्य कलाकार आहेत ज्यांनी प्रचंड मेहनत करुन या क्षेत्रात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. 2 / 9बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांमध्ये असेही काही कलाकार पाहायला मिळतात जे खऱ्या आयुष्यातही प्रचंड मेहनत करुन या क्षेत्रात आले आहेत. आज अशाच एका अभिनेत्रीविषयी आपण जाणून घेणार आहोत.3 / 94 / 9'कमरिया, 'साकी-साकी' असे अनेक सुपरहिट गाणी देणारी लोकप्रिय डान्सर म्हणजे नोरा फतेही (Nora Fatehi). आपल्या नृत्यशैलीच्या जोरावर नोराने कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.5 / 9प्रसिद्धी, यश उपभोगणारी ही अभिनेत्री मोठ्या कठीण काळातून वर आली आहे. वयाच्या १६ व्या वर्षापासून नोराने नोकरी करण्यास सुरुवात केली होती.6 / 9एका मुलाखतीत नोराने तिच्या पूर्वायुष्याबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला.यात तिने एका मॉलमध्ये सेल्स गर्ल म्हणून काम केल्याचं सांगितलं.7 / 9'मी वयाच्या १६ व्या वर्षापासून नोकरी करायला लागले. एका मॉलमध्ये मी रिटेल सेल्स एसोसिएट म्हणून काम करत होते. ही माझी पहिलीच नोकरी होती. हा मॉल माझ्या शाळेच्या जवळ होता. त्यामुळे शाळा सुटल्यावर मी काम करायला जायचे', असं नोरा म्हणाली.8 / 9पुढे ती म्हणते, 'माझ्या घरी आर्थिक प्रॉब्लेम्स खूप होते. त्यामुळे मला कमी वयातच नोकरी करावी लागली. यावेळी तिने बॉलिवूडमध्ये आलेल्या अनुभवांवरही भाष्य केलं.'9 / 9दरम्यान, तिच्या भाषेवरुनही अनेकांनी तिची खिल्ली उडवली होती. अनेक जण तिला सतत हसायचे असं तिने यावेळी सांगितलं. मात्र, हे सांगत असताना तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं.