ना TV, ना OTT… सगळीकडून गायब आहे ही अभिनेत्री, तरीही वेधून घेते लक्ष, कोण आहे ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 20:23 IST
1 / 6 एक काळ होता जेव्हा ही अभिनेत्री टीव्ही मालिकांमधील प्रमुख चेहरा असायची. आजही ती परतली तर पुन्हा एकदा मोठा धमाका करू शकते. मात्र सध्या ती कुठल्याही टीव्ही मालिकेमध्ये दिसत नाही आहे. तसेच ती कुठल्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवरही झळकत नाही आहे. मात्र ती कुठेही गेली तरी अजूनही लक्ष वेधून घेते. 2 / 6पण तुम्ही या अभिनेत्रीला ओळखलंत का? ही आहे रश्मी देसाई. तिची स्टाईल आणि बोल्डनेस पाहून आजही चाहते अवाक् होतात. रश्मी देसाईल पुन्हा एकदा खूप ग्लॅमरस रूपात स्पॉट केलं गेलंय, तिथे ती स्टायलिश बॅकलेस टॉप आणि पँट परिधान करून आली होती. 3 / 6माही विज आणि जय भानुशाली यांची मुलगी तारा हिच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये टीव्ही इंडस्ट्रीमधील अनेक प्रख्यात चेहरे आले होते. मात्र जेव्हा रश्मी देसाईने एंट्री केली तेव्हा सर्वांच्या नजरा आपसुकपणे तिच्याकडे वळल्या. तिचा स्टायलिश अंदाज पाहून उपस्थित मंडळी स्तब्ध झाली. 4 / 6३७ वर्षीय रश्मी देसाईने या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये सर्वांना घायाळ केले. म्हटलं तर या पार्टीमध्ये इतर अनेक कलाकारही उपस्थित होते. मात्र रश्मीवरून कुणाचीही नजर हटत नव्हती. आता हे फोटो सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहेत. 5 / 6रश्मी देसाईबरोबरच आणखी काही जण या पार्टीमध्ये चर्चेचा विषय ठरले होते. त्यातील एक म्हणजे गौहर खान. गौहर हल्लीच आई बनली आहे. मात्र बाळंतपणानंतर गौहर पुन्हा एकदा फिट झाली आहे. तसेच या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावरील तेज आणि फिटनेस लक्षणीय दिसत आहे. 6 / 6तसेच देबिना बॅनर्जीसुद्धा दोन्ही लेकींसह या पार्टीमध्ये आली होती. देबिना हिने दोन्ही मुलींना एकसारखीच फ्रॉक घातली होती. तिने पापाराझींनाही मनसोक्त पोझ दिल्या.