Join us
Daily Top 2Weekly Top 5

एक दुजे के लिए! अखेर स्वीटू झाली खानविलकरांची सून; पाहा लग्नाचा अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 15:00 IST

1 / 8
छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे येऊ 'कशी तशी मी नांदायला'. ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली.
2 / 8
या मालिकेच्या कथानकासोबतच त्यातील ओम, स्वीटू, नलू, शकू ही पात्रही चांगलीच गाजली. त्यातच ओम आणि स्वीटूच्या लव्हस्टोरीने तर अक्षरश: प्रेक्षकांना वेड लावलं.
3 / 8
खऱ्या प्रेमात अनेक अडचणी येतात हे सगळ्यांनाच ठावूक आहे. मात्र, अनेक संकटांवर मात करुन जे एकत्र येतात तेच खरं प्रेम असं म्हटलं जातं. असंच काहीसं या मालिकेत ओम आणि स्वीटूच्या बाबतीत झालं.
4 / 8
ओम आणि स्वीटू या दोघांच्या नात्यात अनेक चढउतार आले. मात्र, एकमेकांवर असलेलं प्रेम आणि विश्वास यांच्या जोरावर अखेर ही जोडी एक झाली.
5 / 8
नुकतंच स्वीटू आणि ओमचं लग्न झालं असून या दोघांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
6 / 8
सध्या सोशल मीडियावर ओम आणि स्वीटूच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहेत.
7 / 8
या लग्नसोहळ्यात स्वीटूने लाल रंगाची सुंदर नक्षीकाम केलेली साडी नेसली होती. तर ओमने शेरवानी परिधान केली होती.
8 / 8
ओम आणि स्वीटू यांचा लग्नातील एक गोड फोटो
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीटिव्ही कलाकार