By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 16:34 IST
1 / 7छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांना आपलंस केलं. 2 / 7कलर्स मराठीवरील 'राजा रानीची गं जोडी' या मालिकेत काम करत शिवानी अल्पावधीतच लोकप्रिय झाली. 3 / 7या मालिकेत तिने साकारलेली संजीवनी म्हणजेच संजू ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली.4 / 7त्यावेळेस मालिकेतील ‘संजीवनी ढालेपाटील’ या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं.5 / 7सध्या शिवानी 'सिंधूताई माझी माई' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. शिवानीचा सोशल मीडियावर भलामोठा चाहतावर्ग आहे.6 / 7नुकतेच शिवानीने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.7 / 7शिवानीने लाल रंगाची साडी परिधान करून हे फोटोशूट केलं आहे. या साडीवर नाकात नथ, कानात झुबे असे साजेसे दागिने तिने घातले आहेत.