1 / 7मराठी मनोरंजन विश्वातील अशी अभिनेत्री जी एकेकाळी प्रेक्षकांची लाडकी होती. तिने मालिका आणि सिनेमांमध्ये अभिनय करुन प्रेक्षकांचं मन जिंकलं. ती अभिनेत्री म्हणजे पल्लवी सुभाष.2 / 7पल्लवी सुभाष लोकप्रियतेच्या शिखरावर असताना एकाएकी इंडस्ट्रीतून गायब झाली. त्यामुळे पल्लवी सध्या काय करते असा प्रश्न तिच्या चाहत्यांच्या मनात आहे. जाणून घेऊया3 / 7पल्लवी सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. ती तिचे विविध अंदाजात फोटोशूट करुन सर्वांचं मन जिंकत असते. पल्लवी सध्या कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये झळकत नाहीये.4 / 7पल्लवीच्या फोटोंवरुन कळून येतं की ती सध्या शूटिंगच्या व्यस्त दिनक्रमातून ब्रेक घेत स्वत:ला वेळ देत आहे. पल्लवीचं वैयक्तिक आयुष्यही चांगलंच चर्चेत आलं होतं.5 / 7पल्लवी अभिनेता अनिकेत विश्वासरावसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघे अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. परंतु काही वैयक्तिक कारणास्तव त्यांचं ब्रेकअप झालं. तरीही त्यांनी एकमेकांच्या प्रायव्हसीचा आदर ठेवला. 6 / 7पल्लवीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, अलीकडच्या काळात 'सेकंड शो' (२०२२) या भारत-श्रीलंका द्विभाषिक भयपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यानंतर पल्लवी कुठेच दिसली नाही.7 / 7पल्लवीने एकेकाळी मराठी मनोरंजन विश्वही गाजवलं आहे. गुंंतता हृदय हे, हॅपी जर्नी, घर होतं मेणाचं, मिरांडा हाऊस अशा लोकप्रिय मालिका आणि सिनेमांमध्ये तिने अभिनय केलाय. पल्लवीला पुन्हा एकदा मराठी इंडस्ट्रीत अभिनय करताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.