अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 14:14 IST
1 / 6गणेश चतुर्थी आली की आपल्याला हमखास आठवणारा चित्रपट म्हणजे अष्टविनायक. प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांची या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका होती या चित्रपटात सचिन पिळगावकर यांनी प्रसिद्ध उद्योगपतीचा मुलगा असलेल्या बाळ इनामदारची भूमिका साकारली होती. 2 / 6सचिन पिळगावकर यांच्यासोबतच शरद तळवलकर, चंद्रकांत मांढरे, पद्मा चव्हाण राजा गोसावी, रमेश भाटकर असे दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये होते. तर बाळ इनामदारची पत्नी वीणा हिची भूमिका वंदना पंडित यांनी साकारली होती. मात्र या चित्रपटानंतर बरीच वर्षे त्या मराठी चित्रपट सृष्टी आणि मनोरंजन जगतापासून दूर होत्या.3 / 6अष्टविनायक चित्रटामध्ये साधीभोळी आणि गणेशभक्त असलेली वीणा आणि नास्तिक असलेले तिचे पती बाळ यांच्यातील वैचारिक आणि भावनिक संघर्ष चित्रित करण्यात आला होता. परस्परांवर खूप प्रेम असलेली पण परस्परविरुद्ध विचारसरणी असलेल्या व्यक्तिरेखा सचिन पिळगावकर यांनी अत्यंत ताकदीने साकारल्या होत्या. 4 / 6अष्टविनायक चित्रपटामध्ये वंदना पंडित यांनी साकारलेल्या वीणा ह्या भूमिकेसाठी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. तसेच त्यांना या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर मराठी पुरस्कारही मिळाला होता. 5 / 6मात्र या चित्रपटानंतर वंदना पंडित ह्या मराठी चित्रपटसृष्टीतून अचानक गायब झाल्या. विवाहानंतर त्यांचं आडनाव शेठ असं झालं होतं. लग्नानंतर त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि व्यवसायामध्ये स्वत:ला गुंतवून घेतलं होतं.6 / 6त्यानंतर सुमारे ४० वर्षांनी वंदना पंडित यांनी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमधून मराठी मनोरंजन क्षेत्रात पुनरागमन केलं होतं. तसेच या मालिकेत त्यांनी सौमित्रच्या आईची भूमिका साकारली होती. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि व्यवसायात गुंतल्याने मनोरंजन क्षेत्रात सातत्यानं काम करणं शक्य झालं नाही, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. आताही त्या मनोरंजन क्षेत्रांमध्ये फारशा सक्रिय नाहीत.