1 / 8'सैराट' सिनेमातून रातोरात स्टार झालेली अभिनेत्री रिंकु राजगुरु (Rinku Rajguru). तिला रिंकु नाही तर आर्ची याच नावाने अख्खा महाराष्ट्र ओळखतो.2 / 8तर सर्वांची लाडकी रिंकूचा आज वाढदिवस. ३ जून २००१ साली रिंकूचा जन्म झाला. आज ती 23 वर्षांची झाली आहे. अकलूज या गावीच तिचं बालपण गेलं. 3 / 8सैराट सिनेमावेळी रिंकू केवळ खूपच लहान होती. ७वी ८वीत असताना तिने सैराटचं शूटिंग केलं होतं. तर १० वीत गेल्यावर तिचा सिनेमा रिलीज झाला होता. रिंकूने सिनेमात कमाल काम केलं होतं. 4 / 8आज रिंकूच्या वाढदिवसानिमित्त सर्वजण तिला भरभरुन शुभेच्छा देत आहेत. रिंकूच्या घरीही लेकीच्या वाढदिवसाची तयारी सुरु आहे. 5 / 8रिंकूची आई आशा राजगुरु यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत लेकीला शुभेच्छा दिल्या आहेत. 'हॅपी बर्थडे टू माय लव्हली अँड स्वीट डॉटर' असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. 6 / 8आशा यांनी रिंकूचा अगदी लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. छोटी रिंकू समोर बसली असून कुतुहलाने कॅमेऱ्याकडे पाहत आहे. तर बाजूला फोटोमध्ये रिंकूसोबतचा लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. दोघींचा हा फोटो खूपच सुंदर आला आहे.7 / 8आशा राजगुरु नेहमी कुटुंबासोबत फोटो शेअर करत असतात. रिंकूला एक भाऊही आहे. सैराट सिनेमानंतर संपूर्ण कुटुंबालाच लोकप्रियता मिळाली होती.8 / 8रिंकूने 'सैराट' शिवाय 'झुंड', 'कागर', 'मेकअप', 'झिम्मा 2' या सिनेमांमध्येही काम केलं. 'झिम्मा 2' मधली तानिया सगळ्यांनाच भावली.