Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सैराट'फेम अभिनेत्रीने इंडस्ट्रीत सांगितलं होतं तिचं खोटं वय; चूक समजली अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 09:04 IST

1 / 8
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे छाया कदम. मराठीसह बॉलिवूडमध्येही छाया कदम यांनी त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
2 / 8
सैराट, फँड्री, न्यूड, हलाल, केसरी, गंगुबाई काठियावाडी अशा कितीतरी गाजलेल्या हिंदी, मराठी सिनेमांमध्ये काम करत छाया कदमने त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला.
3 / 8
छाया कदम यांच्या अभिनयाचं कौतुक बिग बींनी सुद्धा केलं आहे. अलिकडेच त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या फिल्मी करिअररविषयी भाष्य केलं. यावेळी त्यांनी त्यांच्या मनातील खंत सुद्धा व्यक्त केली.
4 / 8
जवळच्या व्यक्तींकडून कामाचं कौतुक होतंच पण कदाचित काही जणांन माझ्याकडून अजून चांगल्या कामाची अपेक्षा असेल त्यामुळे त्यांनी माझं कौतुक केलं नाही, असं छाया कदम म्हणाल्या.
5 / 8
या मुलाखतीमध्य छाया कदम यांनी इंडस्ट्रीमध्ये आल्यावर मी माझं खोटं वय सांगितलं असंही त्यांनी सांगितलं.
6 / 8
'इंडस्ट्रीत काम करताना अनेक जण माझं वय विचारायचे. पण, मी त्यावेळी माझं वय खोटं सांगायचे. मी माझं वय कमीच सांगायचे.'
7 / 8
'वय खोटं सांगत असताना मी अनेकदा माती खाल्ली आहे. कारण, वय कमी सांगण्याच्या भानगडीत त्या जन्माचं वर्ष कोणतं हे सांगतांना मी गोंधळ करायचे.'
8 / 8
कायम वयाच्या वर्षाचा गोंधळ व्हायचा त्यामुळे हे असं खोटं बोलत राहण्यापेक्षा ही सवय मोडलेली बरी असं म्हणून मी ती सवय मोडून टाकली.
टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमाअमिताभ बच्चनबॉलिवूड