"मी लग्न करेन तेव्हा..." कृष्णराज महाडिकांसोबतच्या 'त्या' फोटोवर पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 11:52 IST
1 / 10'सैराट' चित्रपटातील अर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) प्रचंड लोकप्रिय आहे. रिंकूचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या प्रत्येक हालचालीकडे त्यांचे लक्ष लागलेले असते.2 / 10काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता कृष्णराज महाडिक यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. 3 / 10कृष्णराज महाडिक यांनी १० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता एक फोटो त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोमध्ये कृष्णराज महाडिक यांच्यासोबत रिंकू राजगुरू दिसत होती. या फोटोला त्यांनी खास कॅप्शन दिले होते. 'आज अभिनेत्री रिंकू राजगुरू कोल्हापूर येथे आल्या आणि त्यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले' असे कृष्णराज महाडिक यांनी म्हटलं. हा फोटो चांगलाच व्हायरल झाला.4 / 10या फोटोमुळे त्यांच्या अफेअर आणि लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता या व्हायरल फोटोवर खुद्द रिंकू राजगुरूने पहिल्यांदाच स्पष्टीकरण (Rinku Rajguru Reaction On Photo With Krishnaraaj Mahadik) दिलं आहे.5 / 10कृष्णराज महाडिकांसोबतच्या त्या व्हायरल फोटोवर सकाळशी बोलताना रिंकू राजगुरू म्हणाली 'मी तो फोटो शेअर केलाच नव्हता. खरं तर आपण कुठेही जातो, तिथं लोक फोटो काढले जातात. तसंच हा फोटो त्यांच्या टीमने काढला होता आणि शेअर केला'.6 / 10पुढे ती म्हणाली, 'आपल्या आयुष्यात तर हे रोजचं घडणारं आहे. माझ्यासाठी हे सगळं काही नवीन नाही. मला ही तेच वाटलं की त्याची इतकी चर्चा आणि बावू करण्याची खरंच गरज नाहीये'.7 / 10रिंकूने तिच्या लग्नाच्या चर्चांवरही स्पष्टपणे भाष्य केले. ती म्हणाली, 'तसंच माझं लग्न ठरेल तेव्हा मी स्वत: सांगेन सगळ्यांना की मी लग्न करतेय. याआधीही अशा लग्नाच्या चर्चा कित्येकवेळा झाल्यात. त्यामुळं अशा चर्चांचा आता जास्त त्रास होत नाही'.8 / 10दरम्यान, रिंकूसोबतच्या फोटोवर बोलताना कृष्णराज महाडिक म्हणाले होते की, 'आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत, पण सगळ्यांना वाटतंय तसं काहीच नाहीये'.9 / 10दरम्यान, 'सैराट' मध्ये रिंकू आणि आकाश ठोसरची जोडी खूप गाजली. दोघं खऱ्या आयुष्यातही एकमेकांना डेट करत असल्याची अनेकदा चर्चा होते. मात्र रिंकूने कायम या चर्चांना नकार दिला आहे.10 / 10नवशक्तीला दिलेल्या मुलाखतीत रिंकूनं म्हटलं होतं की, 'बेटर हाफ कसा पाहिजे असा मी काही विचार केला नाही. बघितल्याच क्षणी वाटलं पाहिजे की हाच तो! सगळ्या मुलींना जे हवं असतं तेच की तो आदर देणारा आणि काळजी घेणारा असावा. गृहित धरणारा नसावा.'