By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 17:32 IST
1 / 8काही चित्रपट अनेक वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. या चित्रपटांमधील कलाकार,संवाद आणि गाणी यांची वर्षानुवर्ष चर्चा होत असते.2 / 8 असाच एक मराठी चित्रपट म्हणजे 'पक पक पकाक'. अभिनेते नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आजही प्रेक्षक मोठ्या आवडीने बघतात. 3 / 8 गौतम जोगळेकर दिग्दर्शित 'पक पक पकाक' सिनेमात नाना पाटेकरांनी साकारेला भुत्या आजही अनेकांच्या लक्षात आहे. २००५ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 4 / 8 भूत्याच्या भूमिकेप्रमाणे चित्रपटातील साळू आणि चिकलूच्या जोडीने देखील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 5 / 8‘पक पक पकाक’मधील साळूची भूमिका अभिनेत्री नारायणी शास्त्रीने साकारली होती. सावळा रंग आणि नऊवारी साडीमध्ये असेलली गावाकडची साळू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.6 / 8चित्रपटात आपल्या सौंदर्याने व अभिनयाने भुरळ पाडणारी साळू खऱ्या आयुष्यात फारच सुंदर दिसते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. 7 / 8 या चित्रपटानंतर नारायणी हिंदी मालिकाविश्वात प्रचंड सक्रिय झाली. तिने ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘पिया का घर’ व ‘लाल बनारसी’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. 8 / 8 नारायणीने २०१५ मध्ये ब्रिटिश बॉयफ्रेंड स्टिव्हन ग्रेव्हरशी लग्न केलं होतं. मागील अनेक ते वर्षांपासून भारतात राहत आहे.