By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:32 IST
1 / 7काहे दिया परदेस मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. सायली सोशल मीडियावर चाहत्यांच्या कायम संपर्कात असते.2 / 7सायली संजीवने केलेल्या लेटेस्ट फोटोशूटची चांगलीच चर्चा आहे. सायली सध्या अंबाजोगाईला गेली आहे. तिथे सायलीने हे खास फोटोशूट केलं आहे.3 / 7सायली संजीवने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली असून त्याला मॅचिंग लाल रंगाचं ब्लाऊज परिधान केलं आहे. कोणताही जास्त मेकअप न करता सायलीने हे फोटोशूट केलं आहे4 / 7सायली या साध्या सोज्वळ पारंपरिक फोटोशूटमध्ये खूप सुंदर दिसतेय. सायली इवलीशी टिकलीही कपाळाला लावली आहे. सायलीचे हे फोटो व्हायरल होताच अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.5 / 7अंतिशय सुंदर, लय भारी दिसतेय, खूप गोड आणि सुंदर अशा कमेंट करुन सायलीच्या या फोटोशूटला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. सायलीचा हा सुंदर अंदाज तिच्या चाहत्यांना भावला आहे6 / 7सायलीने अंबाजोगाईत हे खास फोटोशूट केलं आहे. सायली अंबाजोगाईला जाण्यामागे खास कारण आहे. आगामी प्रोजेक्टच्या निमित्ताने सायली या ठिकाणी गेली आहे.7 / 7सायलीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती नुकतीच दोन मराठी सिनेमांमध्ये झळकली. यापैकी एका सिनेमात तिची जोडी शशांक केतकरसोबत जमली होती.