Join us

सौंदर्य तिचं आरस्पानी! मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या सविता प्रभूणेंची लेक दिसायला सुंदर, अभिनय नाही 'या' क्षेत्रात करते काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 16:53 IST

1 / 7
अभिनेत्री सविता प्रभूणे यांचं नाव मराठी कलाविश्वात मोठ्या आदराने घेतलं. छक्के पंजे, खरा वारसदार, लपंडाव, कळत नकळत अशा अनेक चित्रपटांत त्यांनी साकारलेल्या मध्यवर्ती भूमिका प्रचंड गाजल्या.
2 / 7
सविता प्रभूणे यांनी आजवर मराठी-हिंदी चित्रपट, मालिका, नाटक अशा तिन्ही माध्यमामध्ये काम करुन चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं.
3 / 7
चेह-यावरच्या निखळ हास्याने आणि सहज सुंदर अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणा-या अभिनेत्री सविता प्रभुणे यांनी मराठी सिनेसृष्टीचा एक काळ त्यांनी गाजवला.
4 / 7
सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली मालिकेत काम करताना दिसत आहे. टीव्ही प्रेमळ सासू, आई साकारणाऱ्या या अभिनेत्रीच्या मुलीला तुम्ही पाहिलंय का?
5 / 7
सविता प्रभुणे यांच्या मुलीचं नाव सात्विका आहे. घटस्फोटानंतर त्यांनी त्यांच्या मुलीचं संगोपन केलं.
6 / 7
सात्विकाने पार्ले टिळकमधून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. सात्विकाने एमबीएची पदवी घेतली आणि याचदरम्यान ती मॉडेलिंगकडे वळली.
7 / 7
2014 मध्ये वॅन हुसेन कॉम्पिटिशनमध्ये मॉडेल म्हणून तिने सहभाग घेतला.सात्विकाचं लग्न झालं असून ती तिच्या संसारात व्यस्त आहे.
टॅग्स :सविता प्रभूणेसेलिब्रिटीसोशल मीडिया