Join us

तदेव लग्नं सुदिनं तदेव.. शिवानी-अजिंक्यच्या विवाहाचा 'गुलाबी' साज; पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 14:06 IST

1 / 9
अभिनेत्री शिवानी सुर्वे(Shivani Surve) आणि अभिनेता अजिंक्य ननावरे (Ajinkya Nanaware)या मराठी सेलिब्रिटी जोडीचा काल थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. ४ वर्ष डेटिंग, नंतर लिव्ह इन रिलेशनशिप आणि आता अखेर लग्न असा त्यांच्या नात्याचा प्रवास आहे.
2 / 9
ठाण्याच्या येऊर येथील एका आलिशान रिसॉर्टमध्ये दोघंही लग्नबंधनात अडकले. मेघा धाडे, कुशल बद्रिके, माधव देवचक्केसह 'झिम्मा 2'च्या कलाकारांनी शिवानीच्या लग्नात हजेरी लावली. आदल्या दिवशीच दोघांनी आधी साखरपुडा करत चाहत्यांना सरप्राईज दिलं होतं.
3 / 9
शिवानीने या ग्रँड वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांनी 'लक्ष्मीनारायणाचा जोडा' शोभतोय अशीच कमेंट केली आहे. या खास दिवशी शिवानीच्या सौंदर्य आणखी खुलून आलं आहे.
4 / 9
दोघांनी लग्नासाठी गुलाबी रंगाची थीम ठेवली होती. गुलाबी लेहेंगा, त्यावर साधाच मेकअप, डोईवर मुंडावळ्या, हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात हार असा तिचा लूक होता. यामध्ये नवरी कमालीची सुंदर दिसत होती.
5 / 9
तर अजिंक्यनेही गुलाबी रंगाचा फेटा बांधला होता. व्हाईट सूटमध्ये तो नेहमीप्रमाणेच हँडसम दिसत होता. दोघांचाही एकमेकांना शोभून दिसेल असा लूक होता.
6 / 9
लग्नात नवरदेवाचा कान पिळण्याची पद्धत असते. तर यावेळी शिवानीच्या भावाने अजिंक्यचा कान पिळला. तो क्षणही सुंदररित्या कॅमेऱ्यात कैद झालेला दिसत आहे. यावेळी अजिंक्य हसतोय तर शिवानीच्या चेहऱ्यावर सरप्राईज झाल्याचे हावभाव दिसत आहेत.
7 / 9
शिवानी-अजिंक्यची लव्हस्टोरीही खूप हटके आहे. 'तू जीवाला गुंतवावे' मालिकेच्या सेटवरच दोघांची मैत्री झाली. मालिका संपल्यानंतरही ते एकमेकांच्या संपर्कात राहिले. पुढे दोघांमध्ये प्रेम फुललं. गेल्या ६ वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत.
8 / 9
सुरुवातीला घरातून त्यांच्या नात्याला विरोध झाला. मात्र शिवानी आणि अजिंक्य यांचं एकमेकांवरील प्रेम पाहता कुटुंबाने अखेर होकार दिला.
9 / 9
आता दोघांनीही आयुष्यभराची गाठ बांधली असून नात्याला नवीन नाव दिलं आहे. शिवानी आणि अजिंक्यला हितचिंतकांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
टॅग्स :शिवानी सुर्वेमराठी अभिनेतालग्नसोशल मीडिया