Join us

सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 17:39 IST

1 / 7
सध्या 'गुलकंद' सिनेमाची चांगलीच चर्चा असून समीर चौघुले आणि सई ताम्हणकर यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा होत आहे. 'गुलकंद' सिनेमात सई ताम्हणकरसोबत रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांची रिअल लाइफमधील पत्नी पाहिलीत का
2 / 7
समीर चौघुले यांची खऱ्या आयुष्यातील मनोरंजन विश्वातील सर्व लाइमलाइटपासून दूर आहेत. समीर यांच्या पत्नीचं नाव आहे कविता
3 / 7
समीर आणि त्यांची पत्नी कविता यांना एक मुलगाही आहे. समीर सोशल मीडियावर त्यांच्या फॅमिलीसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात.
4 / 7
समीर आणि त्यांच्या कुटुंबाच्या साधेपणाचं सर्वजण कौतुक करतात. समीर त्यांच्या पत्नीविषयी सोशल मीडियावर पोस्ट लिहित असतात.
5 / 7
समीर आणि त्यांची पत्नी कविता यांच्या लग्नाला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. समीर आणि त्यांची पत्नी वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असतात
6 / 7
महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि इतर प्रोजेक्ट्सच्या शूटिंगमधून वेळ काढत समीर चौघुले पत्नी आणि कुटुंबालाही तितकंच प्राधान्य देतात.
7 / 7
सध्या समीर चौघुले यांच्या 'गुलकंद' सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. सई ताम्हणकर-समीर चौघुले यांच्या हटके जोडीला सर्वांचं प्रेम मिळालंय
टॅग्स :समीर चौगुलेसई ताम्हणकरप्रसाद ओक मराठी चित्रपटमराठी अभिनेतामहाराष्ट्राची हास्य जत्रा