Join us  

अतुल परचुरेंच्या मुलीविषयी माहितीये का? कलाविश्व सोडून 'या' क्षेत्रात कमावतीये नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 8:00 AM

1 / 8
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे अतुल परचुरे. आजवर असंख्य मालिका, चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
2 / 8
अतुल परचुरे यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नी सोनिया परचुरेदेखील कलाविश्वात सक्रीय आहे. सोनिया प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका आणि अभिनेत्री आहे हे साऱ्यांनाच ठावूक आहे.
3 / 8
विशेष म्हणजे अतुल परचुरे आणि सोनिया परचुरे यांना एक लेक असून ती कलाविश्वापासून दूर आहे.
4 / 8
अतुल परचुरे यांच्या लेकीचं नाव सखील परचुरे असं आहे. विशेष म्हणजे सखील एका वेगळ्या क्षेत्रात नाम कमवत आहे.
5 / 8
सखीलने लहान असताना तिने एका चित्रपटात काम केलं होतं. मात्र, त्यानंतर तिने वेगळी वाट धरली. तिने पोरबाजार या चित्रपटात काम केलं होतं.
6 / 8
सखील एक फॅशन डिझायनर असून तिचा स्वत:चा कपड्यांचा ब्रँड आहे.
7 / 8
पेपरमिंट बॉम्बे या नावाने तिचं डिझाइन गारमेंट शॉप आहे. या ब्रँड अंतर्गत तिने अनेक अभिनेत्रींचे ड्रेस डिझाइन केले आहेत.
8 / 8
सखील सोशल मीडियावर सक्रीय असून तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
टॅग्स :अतुल परचुरेसेलिब्रिटीसिनेमा