Join us
Daily Top 2Weekly Top 5

'नटरंग'नंतर अजय-अतुलसोबत भांडण झालं का? रवी जाधव यांनी दिलं उत्तर, म्हणाले- "ते सध्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 16:07 IST

1 / 7
नटरंगनंतर अजय-अतुलसोबत रवी जाधव यांची भांडणं झाली त्यामुळे बालगंधर्व आणि टाईमपास सिनेमात रवी यांनी अजय-अतुलला संगीतकार म्हणून घेतलं नाही? असा प्रश्न रवी जाधव यांना विचारण्यात आला. त्यावेळी रवी काय म्हणाले?
2 / 7
कॅचअप चॅनलला दिलेल्या मुलाखतीत रवी जाधव म्हणाले, ''नटरंगनंतर अजय-अतुलचे जेवढे पण लाईव्ह शो झाले त्या सगळ्यांचं कँपेनिंग मी केलंय. त्या सगळ्यांचं शूटिंग मी केलं आहे. त्या दोघांचे सर्वोत्तम फोटो माझ्याकडे आहेत.''
3 / 7
''आम्ही प्रत्येक वेळी एवढं एन्जॉय केलं. जाऊं द्या ना बाळासाहेबमध्ये डीजेचं जे गाणं आहे,त्याच्या शूटिंगला मी गेलो होतो. फक्त आम्ही एकत्र काम नाही केलंय.'', असंही रवी म्हणाले
4 / 7
''नटरंगनंतर मी सिनेमे कोणते केले तर, बालगंधर्व ज्यात नाट्यसंगीत होतं. बालक-पालक ज्यात संगीतच नव्हतं. टाईमपासमध्ये मला नवं काहीतरी ट्राय करुया, असं वाटलेलं.'', असा खुलासा रवी जाधव यांनी केला.
5 / 7
''अजय-अतुल हे माझ्या मनात दैदिप्यमान संगीत आहे. बँजोच्या वेळी आम्ही एकत्र काम करणार होतो. पण माझं त्यांच्याशी आणि त्यांचं माझ्याशी कधीच भांडण झालं नाही. अजय-अतुल लाईव्हचं पोस्टर आणि लोगो मी केला आहे.'', रवी जाधव यांनी सांगितलं
6 / 7
''अजय-अतुल माझ्यासाठी आधीही दैवी होतो आणि आताही दैवीच आहेत. ज्यावेळी मला असं वाटेल ना, की त्यांच्याकडे घेऊन जायला माझ्याकडे काहीतरी आहे. तेव्हा मी त्यांना अप्रोच करेन. कारण ते मोठमोठे प्रोजेक्ट करतात. ते सध्या व्यस्त आहेत.'', अशाप्रकारे रवी यांनी प्रश्नाला उत्तर दिलं
7 / 7
अशाप्रकारे रवी जाधव यांनी अजय-अतुलच्या नात्याविषयी खुलासा केला. एकूणच रवी जाधव भविष्यात अजय-अतुलसोबत काम करतील, याची सर्वांना आशा आहे.
टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकाररवी जाधवमराठी अभिनेतामराठी चित्रपट