Bigg Boss Marathi 3: आदिश वैद्यची रिअल लाइफ Bigg boss कोण माहितीये का? पाहा त्याच्या ladyloveचे ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 15:45 IST
1 / 11'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे आदिश वैद्य.2 / 11या मालिकेत आदिशने निलिमा आणि माधव यांच्या मुलाची आर्चिसची भूमिका साकारली होती. सध्या आदिश 'बिग बॉस मराठी ३' मध्ये दिसून येत आहे.3 / 11आदिशने बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केल्यापासून सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगू लागली आहे. यामध्येच त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबत त्याची पर्सनल लाइफही चर्चेत आली आहे.4 / 11सध्या नेटकऱ्यांमध्ये आदिशच्या प्रेयसीची चर्चा रंगली आहे. आदिशची प्रेयसीदेखील त्याच्या प्रमाणेच लोकप्रिय अभिनेत्री आहे.5 / 11रेवती लेले असं आदिशच्या प्रेयसीचं नाव असून ती अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम कथ्थक नृत्यांगना आहे. 6 / 11रेवतीने अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे7 / 11रेवती सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह आहे.8 / 11रेवती अनेकदा आदिशसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 9 / 11रमा आणि माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित ‘स्वामिनी’ या मालिकेतील रेवतीने रमा ही भूमिका साकारली होती. 10 / 11मूळची जळगावची असलेली रेवती अभिनेत्री व मॉडेल आहे. 11 / 11आदिशने रात्रीस खेळ चाले या मालिकेनंतर लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेत काम केले होते तर रेवती वर्तुळ या मालिकेत दिसली होती.