By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 18:09 IST
1 / 7'बालक पालक' हा २०१३ साली आलेला सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमातील सर्वच बालकलाकारांवर प्रेक्षकांनी चांगलंच प्रेम केलं2 / 7या सिनेमात डॉलीची भूमिकाही चांगलीच गाजली. अभिनेत्री शाश्वती पिंपळीकरने ही भूमिका साकारली होती3 / 7शाश्वती आता मोठी झाली असून तिला तुम्ही ओळखूच शकणार नाही. शाश्वतीने या सिनेमानंतर पुढेही अनेक सिनेमा, मालिकांमध्ये काम केलं.4 / 7शाश्वती सध्या 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत अभिनय करत आहे. याआधी शाश्वतीने 'मधु इथे अन् चंद्र तिथे', 'चाहूल' या मालिकांमध्ये आणि सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.5 / 7शाश्वतीने काही वर्षांपूर्वी लग्न केलं आणि चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. शाश्वतीने राजेंद्र करमरकरसोबत लग्नगाठ बांधली आहे.6 / 7शाश्वती पिंपळीकर सध्या 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत साकारणारी भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. 7 / 7आज स्वतःच्या मेहनतीच्या आणि टॅलेंटच्या जोरावर मराठी मनोरंजन विश्वात शाश्वती स्वतःचं स्थान निर्माण करत आहे. एकूणच 'बालक पालक'मधली 'डॉली' आजही प्रेक्षकांची फेव्हरेट आहे