1 / 10मराठीतील सुपरस्टार अशोक सराफ 'अशी ही जमवाजमवी' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने ते अनेक ठिकाणी मुलाखती देत आहेत. 2 / 10नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी त्यांच्यासोबत ‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकाच्या प्रयोगावेळी घडलेला धक्कादायक प्रसंग सांगतिला. 3 / 10एका मिलमध्ये या नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता. तिथे स्टेज नसल्याने एका चौथऱ्यावर सेट लावण्यात आला होता. 4 / 10कोठीवरच्या बायका नेहमी खाली बसतात. त्यामुळे हे संपूर्ण नाटक स्टेजवर बसूनच करायचं होतं. पण, रंगमंच नसल्याने मागच्या प्रेक्षकांना ते दिसतच नव्हतं. 5 / 10त्यामुळे प्रेक्षकांनी गोंधळ करायला सुरुवात केली. परिस्थिती लक्षात येताच नाटक थांबवून पडदा टाकण्यात आला. 6 / 10तुम्ही उभं राहून नाटक का करत नाही? असं त्यांचं म्हणणं होतं. पण, कोठीवरचं नाटक उभं राहून करणं शक्य नव्हतं. 7 / 10त्यानंतर चिडलेल्या प्रेक्षकांनी खुर्च्या मोडल्या, ट्युबलाइट्स फोडल्या...ड्रायव्हर झोपला होता, त्याला बाहेर काढून मारलं, असं अशोक सराफ यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 8 / 10लोकांचा हा गोंधळ पाहून नाना अशोक सराफ यांना घेऊन बाहेर पडले. कारण, त्यांना माहीत होतं लोक आधी येऊन अशोक सराफ यांना धरतील. 9 / 10'सगळीकडे काळोख आणि त्यात चिखल. त्यातून पळत पळत येत आम्ही रस्त्यावर एक रिक्षा थांबवली. नानाने रिक्षावाल्याला माझ्या बाजूला बसवलं आणि स्वत: रिक्षा चालवत मला रेस्टहाऊसला सोडलं'. 10 / 10'मला सोडून नाना बाकीच्या लोकांना आणायला गेला. तोपर्यंत थिएटर फोडून सगळ्या लोकांनी वाट लावली होती. मी लोकांच्या हातात सापडलो असतो तर माझेही तुकडे केले असते.”