1 / 7प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ताला आपण विविध सिनेमा, मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय.2 / 7प्राजक्ता माळीचं मनमोकळं बोलणं, दिलखुलास हसणं अशा सर्व गोष्टींसाठी चाहते तिच्यावर मनापासून प्रेम करतात. प्राजक्ता माळीचं पंढरपूरसोबत एक खास कनेक्शन आहे. तुम्हाला माहितीये?3 / 7प्राजक्ता माळीचं आजोळ पंढरपूरमध्ये आहे. पंढरपूर तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यात भाळवणी हे गाव आहे. हेच प्राजक्ताचं आजोळ आहे.4 / 7प्राजक्ता शूटिंगमधून आणि व्यस्त दिनक्रमातून आवर्जुन वेळ काढत आजोळी भेट देत असते. पंढरपूर तालुक्यातील नायकाची भाळवणी हे गाव कावड यात्रेसाठी प्रसिद्ध आहे5 / 7प्राजक्ता दरवर्षी या कावड यात्रेला सहकुटुंब सहपरिवार हजेरी लावत असते. प्राजक्ता सोशल मीडियावर या यात्रेचे फोटो शेअर करताना दिसते.6 / 7प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ती सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचं सूत्रसंचालन करताना दिसते. प्राजक्ताच्या खुमासदार शैलीने या शोला रंगत निर्माण होते. 7 / 7प्राजक्ता माळी २०२४ मध्ये फुलवंती सिनेमा प्रमुख भूमिका साकारली. याशिवाय प्रसाद खांडेकर दिग्दर्शित चिकी चिकी बुबुम बुम सिनेमात प्राजक्ता झळकली. प्राजक्ताच्या नवीन सिनेमाची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.