Join us  

PHOTOS : अग्गंबाई सूनबाई! तेजश्री प्रधानचं ग्लॅमरस फोटोशूट, दिसतेय फारच CUTE

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 12:32 PM

1 / 8
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तेजश्री प्रधान घराघरातील रसिकांची लाडकी अभिनेत्री. आपल्या भूमिकांनी तिने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. (All Photos -@tejashripradhan)
2 / 8
छोट्या पडद्यावरच नाही तर रुपेरी पडद्यावरही तेजश्रीने आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. विविध चित्रपटातील तिच्या भूमिका रसिकांना भावल्या आहेत.
3 / 8
सध्या चर्चा आहे ती तेजश्रीच्या नव्या फोटोंची. होय, ‘अग्गंबाई सूनबाई’ फेम तेजश्रीनं नवं फोटोशूट केलं आहे.
4 / 8
या फोटोंमध्ये तेजश्री काळ्या रंगाच्या फ्लोरल ड्रेसमध्ये दिसतेय. या ड्रेसमध्ये तिने एक से बढकर एक हटके पोझ दिल्या आहेत.
5 / 8
तेजश्रीचा हा अंदाज चाहत्यांना भलताच आवडला आहे. चाहते तिच्या या फोटोंवर कमेंट्स वर्षाव करत आहेत.
6 / 8
छोटा पडदा आणि मोठ्या पडद्यानंतर हिंदी तसंच मराठी रंगभूमीवरही तेजश्रीने छाप पाडली आहे. हिंदी असो किंवा मराठी नाट्य रसिक तेजश्रीच्या अभिनयावर फिदा आहेत.
7 / 8
तेजश्री सोशल मीडियावरही बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते.
8 / 8
फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून आपले विचार तसंच स्वत:चे फोटो ती आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.
टॅग्स :तेजश्री प्रधान टेलिव्हिजनटिव्ही कलाकार