By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 12:09 IST
1 / 7मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्री एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. परंतु काही कारणास्तव या अभिनेत्रींनी पुढे काम करणं थांबवलं. अशीच एक अभिनेत्री तब्बल १० वर्षांनी मराठी मालिकाविश्वात कमबॅक करत आहे.2 / 7ही अभिनेत्री आहे सोनाली पंडित नाईक. सोनाली पंडितने टीव्ही इंडस्ट्रीतील एक काळ गाजवला आहे. सोनालीची प्रपंच ही मालिका अल्फा मराठीवर चांगलीच गाजली होती.3 / 7पुढे सोनालीने हिंदी मालिकांची वाट धरली. मॅडम सर मालिकेत सोनालीने साकारलेली पुष्पा सिंह ही भूमिका प्रचंड गाजली4 / 7याशिवाय यहा मैं घर घर खेली, प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा, गठबंधन या गाजलेल्या हिंदी मालिकांमध्ये सोनालीने काम केलं. सोनालीला हिंदी टीव्ही इंडस्ट्रीत चांगलीच लोकप्रियता मिळाली.5 / 7सोनालीने प्रपंच मालिकेत घरच्यांच्या दबावामुळे लग्न करणारी, शिक्षणाची आवड असूनही संसारात रमलेल्या मुलीची भूमिका सुंदरपणे साकारली होती. आजही ही भूमिका दर्दी रसिकांच्या स्मरणात आहे6 / 7सोनाली पंडित आता तब्बल १० वर्षांनी मराठी मालिकेत कमबॅक करत आहे. कलर्स मराठीवरील मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी या नव्याने सुरु होणाऱ्या मालिकेत सोनाली झळकणार आहे7 / 7मोहिनी आणि कार्तिकीची धाडसी आई शालिनीच्या भूमिकेत सोनाली झळकणार आहे. अनेक वर्षांनी सोनालीला या मालिकेत पाहायला चाहते उत्सुक आहेत