Join us  

ठसकेबाज सायलीचा मराठमोळा स्वॅग; साडीतला हा फोटो पाहून पडला तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 5:05 PM

1 / 8
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. उत्तम अभिनयाच्या जोरावर सायली अल्पावधीत लोकप्रिय झाली.
2 / 8
काहे दिया परदेस या मालिकेतून सायली नावारुपाला आली. विशेष म्हणजे पहिल्याच मालिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.
3 / 8
अनेक मालिका, सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या सायलीचा झिम्मा 2 हा सिनेमा अलिकडेच प्रदर्शित झाला. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर ती चर्चेत आहे.
4 / 8
सायली सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे तिच्याविषयीचे प्रत्येक अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
5 / 8
सायलीने नुकताच इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. 'पैठणी + नथ + गॉगल्स = स्वॅग' असं कॅप्शन देत तिने हा फोटो शेअर केला आहे.
6 / 8
सायलीचा आज मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.
7 / 8
सायलीच्या प्रत्येक फोटोवर चाहते कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडत असतात.
8 / 8
सायलीने 'गोष्ट एका पैठणीची', 'बस्ता', 'मन फकिरा', 'झिम्मा', 'सातारचा सलमान', 'आटपाडी नाईट्स' या चित्रपटांत काम केलं आहे.
टॅग्स :सायली संजीवसेलिब्रिटीसिनेमाटिव्ही कलाकार