लग्नापूर्वीच हृता-प्रतीक झाले रोमॅण्टिक; साखरपुड्याचे अनसीन फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 14:42 IST
1 / 9छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे (Hruta Durgule). काही दिवसांपूर्वीच हृताने प्रियकर प्रतीक शाहसोबत (Prateek Shah) साखरपुडा केला.2 / 9२४ डिसेंबर रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रतीक आणि हृताचा साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे काही फोटोही हृताने सोशल मीडियावर शेअर केले होते.3 / 9सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या हृताने अलिकडेच तिच्या साखरपुड्यामधील काही अनसीन फोटो शेअर केले आहेत.4 / 9या फोटोमध्ये हृता आणि प्रतीक रोमॅण्टिक अंदाजात असल्याचं दिसून येत आहे.5 / 9साखरपुड्याच्या वेळी प्रतीक आणि हृताने खास फोटोशूट केलं आहे.6 / 9हृता आणि प्रतीकचा रोमॅण्टिक फोटो होतोय व्हायरल7 / 9उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या हृताच्या जीवनातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.8 / 9हृता मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. फूलपाखरु, दुर्वा, मन उडू उडू झालं या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. तसंच काही नाटकांमध्येही ती झळकली आहे.9 / 9हृताचा होणार नवरा प्रतीक शाह लोकप्रिय टीव्ही दिग्दर्शक आहे. प्रतीकने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. बेहद २', 'बहू बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'तेरी मेरी एक जिंदड़ी' या मालिकांसाठी त्याने काम केले आहे.